लंडन: ब्रिटनच्या Rolls-Royce Motor Cars ने सोमवारी गेल्या वर्षभरातील विक्रमी विक्रीची माहिती शेअर केली. कोरोना संकट (Coronavirus) आणि सेमीकंडक्टरची (Semiconductor) तीव्र कमतरता असतानाही, कंपनीने आपल्या लक्झरी स्टेटस सिम्बॉल वाहनांच्या विक्रीत एक नवीन टप्पा गाठला आहे.
जर्मनीची मालकी असलेल्या लक्झरी कार निर्माता कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'अमेरिका (यूएस), आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि चीनसह जगातील अनेक देशांमध्ये चांगली कामगिरी करून गाड्यांच्या विक्रीचा हा नवा टप्पा गाठला आहे. काही देशांमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कंपनीच्या लक्झरी गाड्यांची विक्री जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 5,586 वर पोहोचली आहे.'
याचबरोबर, Rolls-Royce Motor Cars चे सीईओ मुलर ओटवोस यांनी म्हटले आहे की, '2021 हे रोल्स-रॉयससाठी अभूतपूर्व वर्ष ठरले. आमच्या 117 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, आम्ही आमच्या प्रत्येक मॉडेलला जागतिक बाजारपेठेत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन आमच्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या कारची डिलिव्हरी वेळेवर केली आहे.'
नवीन इलेक्ट्रिक कार लाँचची तयारीऑटो निर्माता कंपनी Rolls-Royce आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार, स्पेक्टर लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, 20 व्या शतकाच्या सुरूवातीस Rolls-Royce कंपनी स्थापित झाली होती. हा ब्रिटीश ब्रँड 1998 मध्ये जर्मन ऑटो दिग्गज BMW ने विकत घेतला.