Royal Enfield कंपनी नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 असं नव्या मोटरसायकलचं नाव असणार आहे. या बाईकची चाचणी सुरू असून तिचा जबरदस्त लूक देखील लीक झाला आहे. नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या आगामी मोटारसायकलची अनेक वैशिष्ट्यं इतर 350 सीसी बाईक सारखीच असू शकतात, जी Quasic 350 (Royal Enfield Classic 350) आणि Meteor 350 (Royal Enfield meteor 350) आहेत. Royal Enfield 350 नेक्स्ट जनरेशन मध्ये येणाऱ्या 5 नवीन फीचर्सबद्दल माहिती जाणून घेऊयात.
१. डिझाइन- नेक्स्ट जनरेशन बुलेट 350 ला रेट्रो इंस्पायर्ड डिझाईन देण्यात येणार आहे, जे सध्याच्या मॉडेल्ससारखंच असेल पण काही बदल पाहायला मिळू शकतात. सर्वात मोठा बदल टेललाइट्सवर दिसेल. तसंच नवीन फेंडरही देण्यात आले आहेत. नवीन हँडलबार युनिट दिसेल. सीट सिंगल पीसमध्ये नवी बुलेट उपलब्ध होईल.
२. नवीन मॉडेल्समध्ये डाउनट्यूब फ्रेम वापरण्यात आली आहे, जी ड्युअल क्रॅडल फ्रेममध्ये आहे. हे डिझाईन जबरदस्त मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सस्पेंशन आणखी मजबूत करू शकते. तसेच, यात रायडिंग आणि हँडलिंगमध्येही सुधारण्यात आली आहे.
३. फीचर्स आणि इक्वीपमेंट: न्यू जनरेशन बुलेट 350 मध्ये कमीत कमी इक्वीपमेंट दिसतील. या बाइकला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक्स मिळतील. तसेच, यात सिंगल एबीएस चॅनल मिळेल. गीअर्स स्विच करण्याचा पर्याय सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असू शकतो.
४. पॉवर ट्रेन: नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये 349 cc, एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे क्लासिक 350 सारखे असेल. हा 5 स्पीड गिअरबॉक्स असू शकतो.
५. संभाव्य लॉन्च टाइम लाइन: नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड 350 या वर्षाच्या अखेरीस भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा त्याची किंमत थोडी जास्त असेल. बाईकची किंमत 1.45 लाख रुपये ते 1.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत असू शकते.