शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

'एनफिल्ड'चा 'रॉयल' कारभार, लॉन्च झाली दमदार Bullet; पाहा फीचर्स अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 3:36 PM

Royal Enfield ने आपली नवीन Bullet 350 लॉन्च केली आहे. जाणून घ्या फीचर्स...

Royal Enfield Bullet 350: भारतीय तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय बुलेट 350 बाईकची वेगळीच क्रेझ आहे. हीच क्रेझ पाहता कंपनीने या प्रसिद्ध बाईकचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाईकमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. या बाईकची किंमत 1.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Royal Enfield ने नवीन Bullet 350 मध्ये एस्थेटिक आणि मॅकेनिकल अपडेट्स दिले आहेत. ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक असून, याचा इतिहास अनेक दशके जुना आहे. विशेष म्हणजे, या मॉडेलचे नाव ब्रँडपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. आजही अनेक भागातील लोक कंपनीचे नाव बुलेट समजतात.

नवीन बुलेट 350 कशी आहे:Royal Enfield ने चेन्नईमध्ये आपली नवीन Bullet 350 लॉन्च केली. कंपनीने ही बाईक नवीन 'J' प्लॅटफॉर्मवर विकसित केली आहे, ज्यावर तुम्हाला नवीन हंटर आणि मेटिअर सारखे मॉडेल्स मिळतात. कंपनीने या बाईकमध्ये 349 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लाँग-स्ट्रोक इंजिन दिले आहे. हे 6,100 rpm वर सुमारे 19.9 bhp पॉवर आउटपुट आणि 4,000 rpm वर 27 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

Royal Enfield च्या नवीन Bullet 350 मध्ये हेडलाइट्स आणि टेललाइट्सचा नवीन सेट देण्यात आला आहे. कंपनीने या बाइकला पूर्वीसारखा रेट्रो लुक दिला आहे. तसेच, यात एलसीडी स्क्रीनसह नवीन डिजिटल-अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याच्या स्विचगियरमध्येही बदल करण्यात आले आहेत. तसेच, याबाईकमध्ये यूएसबी पोर्टही आहे. 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहन