शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रॉयल एनफील्डने फसविले; पिगासस 500 बाईक कचऱ्यात टाकल्या; कंपनी नरमली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 12:15 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डने काढलेल्या लिमिटेड एडिशन पिगासस 500 ला कचऱ्यात फेकण्यात आले होते. हा वाद आजही थांबल्याचे दिसत नाही. कारणही तसेच आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डने काढलेल्या लिमिटेड एडिशन पिगासस 500 ला कचऱ्यात फेकण्यात आले होते. हा वाद आजही थांबल्याचे दिसत नाही. कारणही तसेच आहे. कंपनीने या नाराज ग्राहकांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. आता हे पर्याय हा वाद सोडवतात की वाढवतात हे येत्या काळात समजेलच. कशावरून झाला होता वाद?

रॉयल एनफिल्डने दुसऱ्या जागतीक महायुद्धामध्ये वापरली गेलेली एनफील्डनेच बनविलेली बाईक Flying Flea या बाईकला स्मरण करण्यासाठी नुकतेच लिमिटेड एडिशन काढले होते. यामध्ये जुन्या Flying Flea सारखाच बाईकचा रंग आणि अॅक्सेसरीजचा वापर केला होता. तसेच कंपनीने केवळ 250 बाईकचीच निर्मिती केली होती. 

या बाईकचे नाव पिगासस 500 असे ठेवण्यात आले होते. या बाईकची किंमत 2.5 लाख ठेवण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे ही बाईक ऑनलाईन बुकिंगद्वारे केवळ तीन मिनिटांत विकली गेली होती. एवढी मोठी किंमत मोजूनही या बाईकमध्ये एबीएस देण्यात आले नव्हते. काही दिवसांतच रॉयल एनफिल्डने आणखी एक बाईक सिग्नल्स 350 लाँच केली. ही दिसायला हुबेहुब पिगासस 500 सारखीच आहे. मात्र या बाईकमध्ये एबीएस देण्यात आला असून किंमतीही एक लाख रुपयांनी कमी ठेवली आहे. यावरून पिगाससच्या ग्राहकामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी निषेध म्हणून नवी कोरी पिगागस बाईक कचऱ्यात टाकून दिली. 

जर कंपनीने दुसरी बाईक लाँच केली तर पिगाससला लिमिटेड एडिशन कसे म्हटले. कंपनीने परदेशात पिगाससची विक्री एबीएस प्रणाली बसवून केलेली असताना भारतीय ग्राहकांच्या जिवाशी का खेळली. कमी किंमतीत तिच बाईक वेगळ्या नावाने लाँच करून एनफिल्डने पिगाससच्या ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप या मालकांनी केला आहे. 

हा वाद अंगाशी येणार असल्याचे दिसू लागताच कंपनीने या ग्राहकांना तीन पर्याय सुचविले आहेत. ग्राहकांनी ही बाईक कंपनीला परत केल्यास त्यांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळणार आहे. दुसऱ्या पर्यायात पिगाससच्या बदल्यात रॉयल एनफिल्ची दुसरी बाईक घ्यावी आणि कंपनी फरकाची रक्कम परत करेल. तर तिसऱ्या पर्यायामध्ये ग्राहकांना तीच बाईक ठेवायची असेल तर एक वर्षाची जादा वॉरंटी आणि दोन मोफत सर्व्हिस मिळणार आहेत. 

टॅग्स :AutomobileवाहनRoyal Enfieldरॉयल एनफिल्ड