Royal Enfield Hunter 350 New Color: Royal Enfield ची Hunter 350 ग्राहकांमध्ये प्ररचंड लोकप्रिय बाईक आहे. कंपनीने त्यांच्या या लोकप्रिय बाईकला दोन नवीन कलर पर्यायांसह आणले आहे. यात डॅपर ओ आणि डॅपर जी, असे कलर मिळतील. यामध्ये O आणि G अक्षरांचा अर्थ केशरी (Orange) आणि हिरवा (Green) असा आहे. या बाईकची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) आहे.
या दोन नवीन रंग पर्यायांव्यतिरिक्त, RE हंटर 350 पोर्टफोलिओमध्ये डॅपर व्हाइट, डॅपर ग्रे, फॅक्टरी ब्लॅक, रिबेल ब्लॅक, रिबेल ब्लू आणि रिबेल रेड आहे. डॅपर ओ कलर व्हेरियंटमध्ये, हंटर 350 वर नारंगी रंगासह आरई लोगो आणि हलक्या केशरी पट्ट्या आहेत. तर, डॅपर जी कलर व्हेरियंटमध्ये हिरव्या रंगासह आरई लोगो मिळेल. हे दोन्ही कलर अतिशय आकर्षक दिसत आहेत.
नवीन J प्लॅटफॉर्मवर आधारित, RE Hunter 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे. हे तेच इंजिन आहे जे Meteor 350 आणि नवीन Classic 350 मध्ये आढळते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. ही पॉवरट्रेन 6100rpm वर 20.2bhp आणि 4,000rpm वर 27Nm जनरेट करते. याची टॉप स्पीड 114kmph आहे.
Royal Enfield Hunter 350 चा व्हीलबेस 1370 mm आहे, जो Meteor 350 आणि Classic 350 पेक्षा लहान आहे. बाईकची इंधन टाकी 13 लिटरची आहे. सीटची उंची 800 मिमी आहे. यात ट्यूबलेस 110/70 फ्रंट आणि 140/70 मागील टायर आहेत. तसेच, यात 17-इंच कास्ट अलॉय रिम्स मिळतात.
ब्रेकिंगसाठी समोर 300mm डिस्क आणि मागील बाजूस 240mm डिस्क्स ब्रेक्स आहेत. याशिवाय ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टम आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाल्यास, समोर 41mm टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस 6-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल ट्विन इमल्शन शॉक ऍब्जॉर्बर आहे.