शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मार्केटमध्ये Royal Enfield करणार धमाल! आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणणार बाईक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 5:38 PM

Royal Enfield Hunter 350 : कंपनीने आपल्या अनेक बाईक्सच्या टेस्टिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रॉयल एनफिल्डचा हंटर 350 दाखवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आगामी वर्षात म्हणजे 2022 मध्ये रॉयल एनफिल्ड वेगवेगळ्या बाईक्स लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील वर्षी भारतात 4 ते 5 नवीन मॉडेल आणू शकते, त्यापैकी एक मॉडेल कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. हे कंपनीचे रॉयल एनफिल्ड हंटर 350  (Royal Enfield Hunter 350) मॉडेल असल्याचे समजते. 

फेब्रुवारी 2022 मध्ये रॉयल एनफिल्ड आपल्या सर्व-नवीन स्क्रॅम 411 लॉन्च करेल, ज्या कंपनीच्या हिमालयन अॅडव्हेंचर बाईकवर आधारित आहेत. या नंतर जवळपास एक महिन्यानंतर कंपनीची  हंटर देशात लॉन्च होऊ शकते. कंपनीने आपल्या अनेक बाईक्सच्या टेस्टिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 1:23 मिनिटांपासून 1:31 मिनिटांपर्यंत रॉयल एनफिल्डचा हंटर 350 दाखवण्यात आली आहे.

मीटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर आधारितमीटिओर  350 च्या प्लॅटफॉर्मवर नवीन बाईक तयार केली जात आहे. तसेच, रॉयल एनफिल्ड हंटर 350 ही जे-प्लॅटफॉर्मवर 349 सीसी इंजिनसह तयार केली जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 22 बीएचपी पॉवर आणि 27 एनएम पीक टॉर्क बनवते. कंपनी या इंजिनसह 5-स्पीड गिअरबॉक्स देऊ शकते. टेस्टिंग व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की, नवीन बाईक 0-100 किमी/ताशी वेगाने पोहोचत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र नवीन बाईकचे वजन मोटिओर 350 पेक्षा खूपच कमी असेल, असे म्हटले जात आहे.

हंटर 350 या सेगमेंटची सर्वात परवडणारी बाईक?रॉयल एनफिल्ड हंटर 350 सेमी-डिजिटल कन्सोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीमसह देखील येईल, जसे की आम्ही 2021 च्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि हिमालयन मॉडेल्समध्ये पाहिले आहे. रॉयल एनफिल्ड हंटर 350 ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी बाईक ठरेल, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे बाईक अधिक चांगले दिसणारे एलईडी डीआरएल आणि ब्लिंकर्स देण्याची शक्यता कमी आहे. 

भारतात लॉन्च झाल्यानंतर रॉयल एनफिल्ड हंटर 350 ही नवीन बाईक Honda CB350RS, Jawa Standard 300, Jawa Forty Two आणि Benelli Imperiale ला टक्कर देईल. तसेच, देशात या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.70 लाख रुपये असेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहन