नवी दिल्ली: तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेला बाइकचा मोठा ब्रँड म्हणजे Royal Enfield. ही कंपनी दिग्गज बाइक निर्मात्यांपैकी आहे. आगामी काही दिवसांत Royal Enfield सर्वांत स्वस्त बाइक लॉंच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. टेस्टिंगदरम्यान रॉयल एनफिल्डची ही नवी बाइक स्पॉट झाल्याचे सांगितले जात आहे. (royal enfield to launch new bike hunter 350 in india soon)
भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये
Royal Enfield पुढील वर्षापर्यंत भारतीय बाजारात ४ ते ५ नवीन बाइक्स लाँच करेल, असे म्हटले जात आहे. तर कंपनीची नवीन क्लासिक ३५० बाइक या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्यात लाँच होईल, त्यानंतर हिमालयन-बेस्ड स्क्रॅम ४११ ही दमदार बाइक कंपनी लाँच करणार आहे. यामध्ये Royal Enfield च्या नव्या Hunter 350 या बाइकचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
सिमेंट क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; उद्या येणार IPO; कंपनी ५ हजार कोटी उभारणार!
Hunter 350 बाइक टेस्टिंगदरम्यान स्पॉट
काही दिवसांपूर्वीच Royal Enfield ची ही आगामी Hunter 350 बाइक टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. यावेळी बाइकच्या रिअर आणि फ्रंट लूकची झलक दिसली. काही रिपोर्टनुसार, कंपनीची ही बाइक भारतातील सर्वांत स्वस्त रॉयल एनफिल्ड असण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.
भन्नाट संधी! Amul ची फ्रेंचायझी घ्या अन् २ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांचा नफा मिळवा
Hunter 350 चे डिझाइन थोडे हटके
Hunter 350 चे डिझाइन रॉयल एनफिल्डच्या अन्य बाइक्सपेक्षा थोडे वेगळ्याचे म्हटले जात आहे. यामध्ये रेट्रो स्टाइल सर्क्युलर हेडलँप्स, सर्क्युलर टर्न सिग्नल, राउंड व्ह्यू मिरर, सर्क्युलर टेल लँप्स आणि टिअर ड्रॉप फ्युल टँक आहे. याशिवाय रॉयल एनफिल्डच्या अन्य बाइक्सपेक्षा या बाइकची हाइट थोडी कमी असेल. महिलांना रायडिंग सोयीस्कर व्हावी, यासाठी Hunter 350 ची हाइट थोडी कमी असणार आहे.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! कंपन्यांचे तब्बल ८ हजार १०० कोटी परत करणार; करविवाद संपणार?
दरम्यान, Royal Enfield आपल्या नवीन Hunter 350 या बाइकमध्ये Meteor 350 प्रमाणेच नवीन J Series 349 cc क्षमतेचे एअर ऑइल कुल्ड इंजिनचा वापर करण्याची शक्यता आहे. हे इंजिन २०.२ hp पॉवर आणि २७ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. इंजिनसोबत ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत येईल, यामध्ये व्हायब्रेशन रिडक्शन फीचर आणि ट्रिपर नेविगेशन फीचरही असण्याची शक्यता आहे.