Royal Enfield Meteor 350 Aurora Variant Launched: भारतातील लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी Royal Enfield ने ग्राहकांना फेस्टिव्ह सीझनमध्ये मोठी भेट दिली आहे. कंपनीने आपल्या पॉवरफुल आणि लोकप्रिय Meteor 350 क्रुझर बाईकचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनीने हे नवीन व्हेरिएंट 3 नवीन रंगांमध्ये लॉन्च केले आहे. यात अरोरा ग्रीन, अरोरा ब्लू आणि अरोरा ब्लॅक कलरचा समावेश आहे. या नवीन व्हेरियंटच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Royal Enfield Meteor 350 Aurora: नवीन काय ?कंपनीने या बाईकमध्ये कॉस्मॅटिक बदलांसह काही नवीन फीचर्स जोडले आहेत. बाइकमध्ये स्पोक व्हील आणि निऑन ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. यासोबतच, एलईडी हेडलाइट्स, ट्रिपर नेव्हिगेशन देण्यात आले आहे.
Royal Enfield Meteor 350 Aurora: किंमत काय आहे?कंपनीने या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.20 लाख रुपये ठेवली आहे. आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Meteor 350 चे चार व्हर्जन असतील, ज्यात फायरबॉल, स्टेलर, अरोरा (नवीन) आणि सुपरनोव्हा व्हर्जन असेल.
Royal Enfield Meteor 350 Aurora: दमदार इंजिन कंपनीच्या वेबसाइटनुसार, या बाइकमध्ये 350 सीसी सिंगल सिलेंडर लाँग स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 20 bhp ची कमाल पॉवर आणि 27 nM चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईक व्यतिरिक्त कंपनी येत्या काही दिवसात हिमालयन 452 लाँच करणार आहे.