शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Royal Enfield मोठ्या धमाक्यासाठी तयार, लवकरच येतेय कमी किमतीतली अ‍ॅडव्हेंचर बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 5:53 PM

Royal enfield

नवी दिल्ली - Royal Enfield ने 2022 मध्ये लॉन्चची तयारी पूर्ण केली आहे आणि कंपनीने या वर्षी सर्वात पहिले Scram 411 लाँच करण्याची घोषणाही केली आहे. रॉयल एनफील्ड 7 मार्चला भारतात एक नवीन अ‍ॅडव्हेंचर दुचाकी लाँच करणार आहे, जी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि हिमालयनचे एक कमी शक्तीशाली व्हेरिअंट आहे. भारतीय ग्राहक या दुचाकीची दीर्घकाळापासून वाट बघत आहेत. ही ऑफ-रोडिंग बरोबरच रस्त्यांवरही चालवली जाऊ शकेल, अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. म्हणजेच रॉयल एनफील्डने स्क्रॅम 411 ही केवळ ऑफ-रोडिंगच नाही, तर शहरी रस्त्यांवरही चलविली जाऊ शकेल अशा पद्धतीने तयार केली आहे.

लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये -ही नवी अ‍ॅडव्हेंचर दुचाकी लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसून आली आहे. या पूर्वीही scrum 411 अनेक वेळा दिसून आली असली तरी, ती ड्युअल टोनमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या बाईकला पुढच्या बाजूला 19-इंचाचे चाक तर मागील बाजूस 17-इंचाचे चाक देण्यात आले आहे. या बाईकची किंमत बहुतेक ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने असेल. हिची अंदाजे किंमत सुमारे 1.90 लाख रुपयांच्या जवळपास असेल.

हिमालयनच्या तुलनेत स्वस्त -रॉयल एनफील्ड हिमालयनच्या तुलनेत नवी स्क्रॅम 411 स्वस्त असेल. स्क्रॅम 411 ला छोटी चाके, सिंगल पीस सीट, छोटे सस्पेंशन ट्रॅव्हल आणि मागच्या बाजूला ग्रॅब रेल दिली आहे. या नव्या दुचाकीला LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC इंजिन असण्याचा अंदाज आहे. जे 411 CC चे असेल आणि 24.3 bhp एवढी शक्ती तयार करेल.

 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहन