नवी दिल्ली : Royal Enfield ने ब्रँडच्या 120 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित EICMA 2021 मध्ये नवीन SG650 मोटरसायकलची कॉन्सेप्ट लाँच केली आहे. ही नवीन कॉन्सेप्ट मोटरसायकल रॉयल एनफिल्डची नवीन क्रूझर बाईक असेल आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Interceptor 650 आणि Continental GT 650 सोबत विकली जाईल. रेट्रो स्टाईलची ही बाईक पुढच्या बाजूला पॉलिश अॅल्युमिनियम फिनिशमध्ये सादर करण्यात आली असून तिच्या टाकीवर डिजिटल ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
रॉयल एनफिल्डच्या पारंपरिक बाइक्सप्रमाणे...रॉयल एनफिल्डची ही कॉन्सेप्ट मोटरसायकल एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएलसह आली आहे. स्लिम इंडिकेटर आणि हेडलॅम्पचा आकार नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेईल. बाईकसोबत टू-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. बाईकच्या मागील बाजूस कंपनीने रेट्रो स्टाइल राउंड टेललाइट दिला आहे.
रॉयल एनफिल्डच्या पारंपारिक बाईक सारखी सीट असली तरी ही खूपच वेगळी आहे आणि एकूणच नवीन कॉन्सेप्ट खूपच मजबूत दिसते. दरम्यान लाँच केल्यावर रॉयल एनफिल्डची ही बाईक Harley-Davidson च्या क्रूझर बाईकशी टक्कर देईल, मात्र या बाईकची किंमत अमेरिकन ब्रँडपेक्षा खूपच कमी असेल.
आधीसारखेच 650 सीसी इंजिन मिळू शकतेबाईकचा पुढचा मडगार्डही तिच्या बॉडीवर खूप चांगला दिसतो आणि मागच्या बाजूला काळ्या रंगाचा मडगार्ड देण्यात आला आहे. कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये ABS, बेस्पोक डिझाइनचे ब्रेक कॅलिपर्स आणि समोरच्या भागात दोन डिस्क ब्रेक आहेत. बाईकच्या पुढील भागाला USD फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत, तर कंपनीने सोबत मजबूत टायर दिले आहेत. बाईकला Interceptor 650 आणि Continental GT 650 प्रमाणेच 650 सीसी इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 47 bhp पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क बनवते.