शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Royal Enfield Sherpa 650: विसरून जाल Bullet, आता Royal Enfield आणतेय अशी ढासू बाईक; पाहताच प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 8:26 PM

माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या रॉयल एनफील्ड 650cc स्क्रॅम्बलरच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचे नाव 'Royal Enfield Sherpa 650' असू शकते. ही आरई बुलेटपेक्षाही वरच्या सेगमेंटमधील बाईक असेल.

रॉयल एनफील्डने काही 350cc आणि 650cc मोटारसायकल लाँच करण्यासंदर्भात पुष्टी केली आहे, यांपैकी काहींचीतर टेस्टिंगदेखील सुरू आहे. हे मॉडेल्स देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्येही उपलब्ध असतील. आगामी नव्या रॉयल एनफील्ड बाईक्सपैकीच एक म्हणजे, 650cc स्क्रॅम्बलर. ही  2022 च्या अखेरीस टेस्टिंग दरम्यान दिसून आली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, या नव्या रॉयल एनफील्ड 650cc स्क्रॅम्बलरच्या प्रोडक्शन-रेडी व्हर्जनचे नाव 'Royal Enfield Sherpa 650' असू शकते. ही आरई बुलेटपेक्षाही वरच्या सेगमेंटमधील बाईक असेल.

Royal Enfield Sherpa 650 चे इंजिन आणि पॉवर -या बाईला 648cc, पॅरेलल-ट्विन इंजिन दिले जाऊ शकते. जे 47bhp पॉवर आणि 52Nm टार्क जनरेट करू शकते. कंपनी क्रूझर मोटारसायकलच्या आवश्यकतेनुसार, इंजिन ट्यून करू शकसते. ही बाईक स्लिपर क्लच आणि 6-स्पीड गिअरबॉक्ससह येईल. हिच्या स्पॉटेड प्रोटोटाईपच्या फ्रंटला अपसाईड-डाऊन फोर्क सस्पेंशन आणि रिअरमध्ये डुअल शॉक एब्जॉर्बर होते. तसेच हिच्या फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेकदेखील दिसून आले होते. या बाईकमध्ये स्टँडर्ड फिटमेन्ट म्हणून डुअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) देखील मिळेल. 

Royal Enfield Sherpa 650 मध्ये असतील असे फीचर्स -नव्या आरई 650 सीसी बाईकच्या पुढील साईडला एक छोटी फ्लायस्क्रीन असेल, जी विंड प्रोटेक्शनच्या रूपात काम करेल. खरे तर ही अॅक्सेसरी पॅकचा भाग असू शकते. आगामी रॉयल एनफील्ड शेरपा 650 ही 2-इनटू-1 एक्झॉस्ट सिस्टिमसोबत येणारी ब्रँडची पहिलीच बाईक असेल. यात रेट्रो-स्टाईल सर्क्युलर हेडलॅम्प, टियरड्रॉप-शेप्ड फ्यूल टँक आणि फ्लॅट सीट असू शकते. या बाईकला सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टिमही देली जाऊ शकते.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकtwo wheelerटू व्हीलर