शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

Royal Enfield भारतात लाँच करणार 6 नवीन बाइक्स! जाणून घ्या काय फीचर्स असू शकतात? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 3:48 PM

Royal Enfield : कंपनी 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये अनेक मोटारसायकल्स लॉन्च करणार आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकल देखील आणणार आहे.

नवी दिल्ली : Scram 411 लाँच केल्यानंतर रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आता 2023 च्या अखेरीस भारतीय बाजारात 6 नवीन मोटरसायकल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनी 350cc आणि 650cc सेगमेंटमध्ये अनेक मोटारसायकल्स लॉन्च करणार आहे. याशिवाय रॉयल एनफिल्ड नवीन हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकल देखील आणणार आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्डच्या आगामी मोटारसायकल्स कोणत्या आहेत? याविषयी जाणून घेऊया...

रॉयल एनफिल्ड SHOTGUN 650रॉयल एनफिल्डने 2021 EICMA मध्ये SG650 कॉन्सेप्टला शोकेस केले होते. मोटारसायकलला राउंड हेडलॅम्प आणि रियर-व्ह्यू मिररसोबत टीयरड्रॉप शेप्ड फ्यूल टँक आणि वाइड  रिअर मडगार्डसारखी क्लासिक डिझाईन एलिमेंटचा समावेश आहे. शॉटगन 650 ला 648cc पॅरलल-ट्विन, एअर-कूल्ड इंजिन मिळण्याची शक्यता आहे, जे 47bhp आणि 52N टॉर्क जनरेट करते.

रॉयल एनफिल्ड SUPER METEOR 650रॉयल एनफिल्ड क्रूझर मोटरसायकलची देखील चाचणी करत आहे, जी Super Meteor असेल. मोटरसायकलमध्ये इंटरसेप्टर 650 असणारा पॉवरट्रेन असू शकतो.  Super Meteor मध्ये अपसाइड डाऊन फ्रंट फोर्क्स आणि रिअरमध्ये ट्विन शॉक एब्जॉर्बर असण्याची शक्यता आहे. तसेच, यात ड्युअल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक दिला जाऊ शकतो. 

रॉयल एनफिल्ड HUNTER 350रॉयल एनफिल्ड कंपनी 2022 च्या मध्यापर्यंत रॉयल एनफिल्ड हंटर 350 लाँच करू शकते. मोटारसायकल भारतात प्रोडक्शन बॉडी पार्ट्ससह दिसली आहे. नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये सिंगल-पीस सीट, आरामदायी एर्गोनॉमिक्स, रेट्रो-शैलीतील वर्तुळाकार हेडलॅम्प, डिस्क ब्रेक्स मिळतील. मोटारसायकलला नवीन 349cc, एअर-कूल्ड इंजिन मिळेल.

नेक्स्ट जनरेशन BULLET 350फक्त हंटरच नाही तर रॉयल एनफिल्डने नेक्स्ट जनरेशन बुलेट 350 ची चाचणी देखील भारतात सुरु केली आहे. नवीन मॉडेल नवीन J-सिरीज प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. या मोटरसायकलला 349 cc, एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे क्लासिक 350 सारखे असेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते.

रॉयल एनफिल्ड CLASSIC 650रॉयल एनफिल्ड 2023 मध्ये देशात एक नवीन 650cc क्लासिक मोटरसायकल लाँच करू शकते. भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा मोटरसायकल चाचणी करताना दिसली आहे. नवीन क्लासिक 650 मध्ये गोलाकार हेडलॅम्प आणि टीयरड्रॉप आकाराची इंधन टाकी यांसारखे रेट्रो डिझाइन एलिमेंट असणार आहेत. क्लासिक 650 मध्ये 649cc, ट्विन सिलेंडर इंजिन असण्याची शक्यता आहे, जे 47bhp आणि 52Nm टॉर्क निर्माण करते.

रॉयल एनफिल्ड HIMALAYAN 450रॉयल एनफिल्ड नवीन पिढीच्या हिमालयन अॅडव्हेंचर मोटारसायकलवर काम करत आहे, जी अलीकडेच भारतात चाचणी करताना दिसून आली. नवीन मोटरसायकल नवीन 450cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनसह येईल, जे सुमारे 40bhp आणि 45Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. हे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. 2023 मध्ये हिमालयन अॅडव्हेंचर लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहन