मारुती सुझुकीची प्रसिद्ध फॅमिली हॅचबॅक कार वॅगनआर गेल्या महन्यात अर्थात जून 2023 मध्ये पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. महत्वाचे म्हणजे, मारुती वॅगनआर ही गेल्या जून महिन्यात ह्यूंदाई क्रेटा आणि टाटा नेक्सॉनसोबतच टाटा पंच सारख्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग एसयूव्हींनाही मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे.
गेल्या जून महिन्यात तब्बल 17,481 लोकांनी मारुती वॅगनआर हॅचबॅकची खरेदी केली आहे. भारतीय बाजारात गेल्या काही महिन्यांपासून वॅगनआर बरोबरच बलेनो आणि स्विफ्ट सारख्या हॅचबॅकचाही दबदबा दिसत आहे. मात्र आता वॅगनआर बलेनोला मागे टाकत लोकांची फेव्हरिट कार बनली आहे. मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते. हिच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.42 लाख रुपये एवढी आहे.
दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी स्विफ्ट -गेल्या महिन्यात अर्थात जून २०२३ मध्ये मारुती सुझुकीची पॉप्युलर हॅचबॅक Swift ही दुसऱ्या क्रमांकाची बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. एकूण 15,955 लोकांनी या कारची खरेदी केली आहे. याशिवाय, जून महिन्यात ह्युंदाई क्रेटा, ही तिसऱ्या क्रमांकाची बेस्ट सेलिंग कार ठरली. एकूण 14,447 ग्राहकांनी या कारची खरेदी केली. तसेच, मे महिन्यात सर्वाधिक विकली गेलेली मारुती सुझुकी बलेनो ही जून महिन्यात चौथ्या क्रमांकावर गेली आहे. जून महिन्यात 14,077 ग्राहकांनी या कारची खरेदी केली आहे.
या आहेत टॉप 10 कार -भारतात गेल्या जून 2023 मधील टॉप 10 सेलिंग कारच्या यादीत अनुक्रमे सहाव्या क्रमांकावर ह्युंदाई व्हेन्यू, यानंतर मारुती सुझुकी अल्टो, टाटा पंच, मारुती सुझुकी ब्रेझा आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा यांचा क्रमांक लागतो.