कार निर्माता कंपन्या केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर कार विक्री करत आहेत. जुलै 2022 मध्ये कार निर्यातीत 3.35 टक्क्यांची वार्षिक वृद्धी झाली आहे. गेल्या महिन्यात तब्बल 54,073 कारची निर्यात झाली. यात मारुती सुझुकीची सर्वाधिक भागीदारी आहे. टॉप 10 पैकी 4 मॉडेल्स हे एकट्या मारुती सुझुकीचे आहेत. तसेच, सर्वाधिक विक्री होणारी कारही मारुती सुझुकीच आहे.
या Maruti कारची परदेशातही झाली जबरदस्त विक्री -जुलै 2022 मध्ये मारुती डिझायर ही सर्वाधिक निर्यात केली गेलेली कार आहे. हिचे 5,601 युनिट्स एक्सपोर्ट झाले आहेत. जुलै 2021 मधील 2,391 युनिट्सच्या तुलनेत dzire ने 134.25 टक्क्यांनी ग्रोथ केली आहे. 5,000 हून अधिक युनिट्सची निर्यात होणारे हे एकमेव प्रवासी वाहन होते.
या गाड्यांचीही झाली जबरदस्त विक्री - लिस्टमध्ये किआ सेल्टोस दुसऱ्या स्थानावर राहिली, जुलै 2022 मध्ये हिचे 4,549 युनिट्स निर्यात झाले आहेत. जुलै 2021 मध्ये एक्सपोर्ट झालेल्या 2,052 युनिट्सच्या तुलनेत हा आकडा 121.69 टक्क्यांनी अधिक आहे.
तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाईची वरना सेडान होती. जुलै 2022मध्ये हिची निर्यात 107.26 टक्क्यांनी वाढून 3,998 युनिटवर गेली आहे. या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर निसान सनी (Nissan Sunny) आणि मारुती एस–प्रेसो (Maruti S-presso) आहे. गेल्या महिन्यात यांचे अनुक्रमे 3,884 युनिट्स आणि 3676 युनिट्स एक्सपोर्ट झाले आहेत.