शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

Vespa 946 Dragon Edition : क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:27 AM

Vespa 946 Dragon Edition : या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे.

नवी दिल्ली :  व्हेस्पा (Vespa) कंपनीने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या स्कूटरची किंमत Hyundai Creta आणि Mahindra Thar पेक्षा जास्त आहे. या स्कूटरची किंमत १४ लाखांपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या या नवीन स्कूटरचे नाव Vespa 946 Dragon Edition आहे. 

हाँगकाँगच्या लूनर न्यू इयर सेलिब्रेशन डेपासून प्रेरित असलेली ही लिमिटेड-एडिशनची स्कूटर आहे. या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र कंपनीने भारतीय बाजारात किती युनिट्स विकले जातील, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

इंजिन डिटेल्सVespa 946 Dragon एडिशनमध्ये तुम्हाला १२ इंचाचे व्हील, फ्रंट आणि रिअरमध्ये २२० mm डिस्क ब्रेक मिळतील. या स्कूटरमध्ये १५० सीसी एअर-कूल्ड इंजिन आहे, जे १२.७ bhp पॉवर आणि १२.८ Nm टॉर्क जनरेट करते.

डिझाईनया Vespa स्कूटरचे हे लिमिटेड-एडिशन मॉडेल गोल्ड कलरमध्ये दिसून येत आहे. तसेच, या स्कूटरवर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये ड्रॅगन काढलेला दिसेल. ही स्कूटर स्टील प्लेट मोनोकोक फ्रेमपासून बनवण्यात आली आहे.

किंमतकंपनीने या स्कूटरची किंमत १४ लाख २८ हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनीकडून ही स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लिमिटेड-एडिशनचे व्हेस्पा ड्रॅगन वर्सिटी जॅकेटही दिले जाईल. देशभरातील Piaggio Motoplex शोरूममध्ये ग्राहकांसाठी या स्कूटरची बुकिंग सुरू झाली आहे.

Hyundai Creta आणि Mahindra Thar ची किंमतह्युंदाई क्रेटाच्या या लोकप्रिय एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत १० लाख ९९ हजार ९०० रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर दुसरीकडे, महिंद्रा थारची सुरुवातीची किंमत ११ लाख ३४ हजार ९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे Vespa स्कूटरची किंमत पाहता, तुम्ही क्रेटा आणि थारचे बेस व्हेरिएंट खरेदी करू शकाल. 

टॅग्स :scooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग