Mahindra Scorpio N Matt Black: महिंद्राच्या Scorpio-N SUV ला लॉन्च झाल्यापासून प्रचंड मागणी आहे. यासाठी अनेक महिन्यांचा प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागत आहे, तर काही भाग्यवान ग्राहकांना त्याची डिलिव्हरी देखील मिळाली आहे. खुद्द महिंद्रा ग्रुपचे चेअरमनही लाल रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ-एन वापरतात. काहींनी आपल्या कारला मॉडिफाय करण्याची प्रचंड आवड असते. यात काहीजण अतिशय कल्पकतेनं मूळ कारच्या लूकमध्ये बदल करुन हटके लूक देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरुन कार रस्त्यावर आली की इतरांपेक्षा वेगळी ठरू शकेल आणि वाहवा मिळवता येईल. नुकतंच स्कॉर्पिओ एनच्या मॉडिफाय कारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याचा लूक पाहून खुद्द आनंद महिंद्रा यांनाही ती कार खरेदी करण्याची इच्छा झाली आहे.
मॉडिफाय लूक पाहून आनंद महिंद्राही त्याचे चाहते झाले आणि त्यांनी एक ट्विट केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये, "मी फक्त एवढेच सांगू शकतो, व्वा! मला मी वापरत असलेली #ScorpioN आवडते पण आता मला हे मान्य करावं लागेल की कार पाहून हेवा वाटू लागला आहे. नेपोली ब्लॅक, सॅटिन मॅट फिनिश तयार करण्यासाठी अरुण पनवार आणि दिल्लीचे रॅपोलिक्स यांचे अभिनंदन"
प्रसिद्ध यूट्यूबर अरुण पनवार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या स्कॉर्पिओचा व्हिडिओ अपलोड केला आहे. स्कॉर्पिओ एनच्या मालकानं त्याची कार हटके दिसण्यासाठी पेंट प्रोटेक्शन फिल्मने (PPF) प्रोटेक्ट केली आहे. यामुळे कारला मॅट ब्लॅक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकूणच कार खूपच आकर्षक दिसते. माहितीनुसार, या मॉडिफिकेशनसाठी एकूण ६५ हजार रुपये खर्च झाले आहेत.
किंमत आणि रंगमहिंद्राने या वर्षी जूनमध्ये आपली स्कॉर्पिओ एन लॉन्च केली होती. त्याची सुरुवातीची किंमत ११.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली होती. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १९.४९ लाख रुपये आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ सात रंगांमध्ये ऑफर केली केली आहे. ज्यात डॅझलिंग सिल्व्हर, डीप फॉरेस्ट, ग्रँड कॅनियन, एव्हरेस्ट व्हाइट, नेपोली ब्लॅक, रेड रेज आणि रॉयल गोल्ड यांचा समावेश आहे.