अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रीक वाहन निर्माता कंपनी टेस्ला लवकरच आपल्या कार भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्याच महिन्यात टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी भारतात सर्वाधिक आयात शुक्ल लावले जाते, ते कमी करावे अशी मागणी केली होती. यावर आधी प्लांट लावा मग पाहू, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता टेस्लाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयात रस्ते परिवाहन आणि राजमार्ग मंत्रालय (MoRTH) परिसरात काढण्यात आला आहे. (Tesla meeting with Morth; ministry secretory Giridhar Aramane took ride of Tesla Model 3.)
टेस्लाने अद्याप त्यांच्या भारतात विकलेल्या कार किती आहेत किंवा त्यांच्या कार कधी लाँच करणार याची तारीख सांगितलेली नाही. मात्र, सरकारसोबत यावर चर्चा सुरु आहे. नुकतीच टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर MoRTH चे सचिव गिरिधर अरमाने यांची भेट घेतली.
इंटरनेटवर या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये टेस्लाचे अधिकारी आणि गिरिधर अरामने यांना टेस्लाच्या मॉडेल 3 च्या प्रवासी सीटवर बसलेले दाखविण्यात आले आहे. अरामने यांनी कार्यालयाच्या चोहोबाजुला या कारची एक फेरी मारली. टेस्ला आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या बैठकीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय. टेस्लाला हे शुल्क कमी करण्याआधी भारतात एक प्लांट उभारावा लागणार आहे.