रेनॉल्टने भारतीय बाजारात गेल्या वर्षी सात सीटर ट्रायबर उतरवली होती. आता तिचे अॅटोमॅटीक व्हर्जन बाजारात आणले आहे. या कारची सुरुवातीची किंमत ६.१८ लाख रुपये आहे. ही कार माय रेनो अॅप आणि डीलरशीपकडून बूक करता येणार आहे. ही कारी मॅन्युअल व्हर्जनच्या ४०००० रुपयांनी जास्त आहे.
ट्रायबरमध्ये ९९९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे ७२ पीएस ताकद निर्माण करते. याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत ७.२२ लाख रुपये आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून डीलरशीप बंद होत्या. पण या वेळी सूट दिल्याने डीलरशीप सुरु करण्यात आल्या आहेत. ट्रायबर एमटीचे तीन व्हेरिअंट उपलब्ध आहेत. RXL, RXT आणि RXZ अशी ही मॉडेल आहेत. ट्रायबरमध्ये तिसरी सीट फिक्स आहे. तसेच मधली सीट स्लायडिंग-फोल्डिंगची आहे. तिसऱ्यासीटवर एसी व्हेंट देण्यात आला आहे. एलईडी इन्स्ट्रूमेंटल क्लस्टर आणि ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
ही कार CMF-A प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. ३९९० एमएम लांबी, १७३९ एमएम रुंदी आणणि १६४३ एमएम उंचीला आहे. 2636 व्हीलबेस आणि १८२ एमएमचा ग्राऊंड क्लिअरन्स आहे. यामध्ये ८४ ते ६२५ लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. तसेच पाच रंगात ही कार उपलब्ध आहे. ९९९ सीसीचे इंजिन ६२५० आरपीएमवर ७२ पीएस आणि ३५०० आरपीएमवर ९६ एमएम टॉर्क तयार करते. ट्रायबर २०.५१ किमीचे मायलेज देते.