लोकांनी हायवेवरून बैलगाड्या चालवाव्या का?; खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 11:58 AM2020-02-19T11:58:14+5:302020-02-19T12:01:16+5:30
देशभरात खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
देशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे. रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. यासाठी हे खड्डेमय रस्तेही जबाबदार असल्याचे अपघातातील कारणांवरून लक्षात येते. यावर पटना उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले आहे. हायवेवरही खड्डयांचे साम्राज्य झाले आहे, आता लोकांनी त्यावरून बैलगाड्या चालवायच्या का? असा सवाल केला आहे.
पटना ते गया या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यावर याचिका दाखल केली असून यावर मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि एस कुमार यांच्या बेंचने सुनावणी घेतली. 18 डिसेंबर 2019 ला करोल गयाला गेले होते. यावेळी प्रवासादरम्य़ान ते खड्ड्यांनी एवढे त्रस्त झाले की येताना ट्रेनचा प्रवास पसंत केला आणि त्यांची कार गयामध्येच सोडून परत आले. यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी भर न्यायालयातच प्रवासाचा अनुभव सांगितला. गयाला गेल्यानंतर पुन्हा पटनाला कारने परतण्य़ाची आपली हिंमत झाली नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तसेच एनएचएआयने या रस्त्याबद्दल जे सांगितले ते प्रत्यक्ष परिस्थितीपासून शेकडो मैल दूर आहे. तेव्हापासून या विषयावर सुनावणी होत आहे.
ग्लोबल एनकॅपकडे एकही कार पाठवणार नाही; सुरक्षा चाचण्यांपासून मारुतीनं काढला पळ
नव्या बॉन्डपटात Land Rover द्वारे चित्तथरारक स्टंट; पाहा 'ती' आहे तरी कोण...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ज्या कंपनीला टेंडर दिले होते त्या कंपनीचे दिवाळे निघाले आहे. 127 किमीच्या लांबच्या या रस्त्याची निविदा 2015 मध्ये निघाली होती. तेव्हा 1232 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, ही निविदा मिळालेली कंपनी दिवाळखोरीत निघाली. यानंतर ऑक्टोबर 2018 पासून काम पूर्ण बंद झाले आहे. यामुळे हा रस्ता तीन टप्प्यांत विभागून नव्य़ाने निविदा मागविण्यात आल्या आहेत. आता याचा खर्च 1795 कोटींवर गेला आहे.