Simple One Electric Scooter भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. 15 ऑगस्टला भारतात दोन ईलेक्ट्रीक स्कूटरची एन्ट्री होणार आहे. यामध्ये सिंपल आणि ओलाच्या स्कूटर असणार आहेत. ओलाच्या स्कूटरला जबरदस्त प्रतिसाद असला तरीदेखील सिंपल एनर्जीची स्कूटर देखील काही कमी नाही. 15 ऑगस्टपासून या स्कूटरचे बुकिंग सुरु होणार आहे. (SIMPLE ENERGY TO OPEN ORDER BOOKS FOR SIMPLE ONE ELECTRIC SCOOTER ON 15 AUGUST)
Simple One EV: 240 किमी रेंजवाली ई-स्कूटर या 13 राज्यांत मिळणार; महाराष्ट्र आहे का?Simple One चा थेट मुकाबला Ola Electric स्कूटरशी होणार आहे. जेवढी माहिती मिळालीय त्यानुसार सिंपल वन स्कूटर भारतातील सर्वाधिक रेंजची स्कूटर आहे. ती देखील जवळपास दुप्पट रेंजने पुढे आहे. सिंपल वन एका चार्जमध्ये 240 किमी धावू शकते. यामुळे ही स्कूटर शहरे, गावांमध्ये देखील उपयुक्त ठरणार आहे.
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्जSimple One Electric Scooter मध्ये 4.8 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. मोठा बॅकअप असल्याने हिला वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नाही. इके मोडवर ही स्कूटर 240 किमी चालविता येते. ही रेंज तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा ओव्हरलोडिंग न करता व कमी वेगाने चालविली तर. असे केले नाही तर रेंज कमी मिळणार आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदांत 50 किमी प्रति तासाचा वेग पकडते. याची टॉप स्पीड 100 किमी प्रति तास असेल.
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...या स्कूटरची किंमत 1 ते 1.20 लाख रुपयांच्या आसपास असेल. सबसिडीमुळे ती आणखी कमी होईल. ही स्कूटर 1,947 रुपयांत बुक करता येणार आहे. सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. याच दिवशीपासून बुकिंग सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर तब्बल 240 किमीची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. Simple Energy (सिंपल एनर्जी) ही स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहिमध्ये ही स्कूटर लाँच करणार होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लाँचिंग टाळण्यात आले. सुरुवातीला जरी ओला स्कूटरची रेंज 240 किमी सांगण्यात येत असली तरीदेखील मीडिया रिपोर्टनुसार ओलाची स्कूटर 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा 90 किमी जास्तची रेंज सिंपल वनची स्कूटर देते.
१३ राज्यांमध्ये मिळणार...Simple One ही ई स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये विकली जाणार आहे. या राज्यांच्या शहरात एक्सपिरिअन्स सेंटर साठी जागा निवडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे असण्याची शक्यता आहे. (The Simple Energy electric scooter will be up for pre-booking on India’s 75th Independence Day, with the reservation amount set at Rs 1,947.)