Simple One High Range Electric Scooter Launch Soon: देशात सध्या ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची (Electric Scooter) धूम आहे. लाँच झाली नाही तोवर एवढ्या बुकिंग मिळाल्या की, जगातील पहिली असा कारनामा करणारे वाहन बनली आहे. परंतू ओलाचा रस्ता एक खतरनाक स्कूटर कठीण करणार आहे. ओलाच्या घोषणेनंतर बंगळुरूच्या सिंपल एनर्जीने देखील 15 ऑगस्टलाच ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामुळे या दोन स्कूटरमध्ये युद्ध रंगणार आहे. (Simple One Electric Scooter Launch on 15 august like Ola.)
Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर
Simple Energy (सिंपल एनर्जी) ही स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहिमध्ये ही स्कूटर लाँच करणार होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लाँचिंग टाळण्यात आले. आता कंपनी अधिकृतरित्या इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच करणार आहे.
ओला स्कूटरला ही स्कूटर टक्कर देण्याची शक्यता आहे. कारण या स्कूटरची रेंज प्रति चार्जिंग 240 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. असे झाल्यास सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर (Simple One Electric Scooter) देशातील सर्वाधिक रेंजची स्कूटर ठरण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीला जरी ओला स्कूटरची रेंज 240 किमी सांगण्यात येत असली तरीदेखील मीडिया रिपोर्टनुसार ओलाची स्कूटर 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा 90 किमी जास्तची रेंज सिंपल वनची स्कूटर देते.
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...सिंपल एनर्जी ही एक स्टार्टअप कंपनी आहे. भारतातील इलेक्ट्रीक मोबिलिटी क्षेत्रात काही महिन्यांपूर्वीच या कंपनीने एन्ट्री केली आहे. ही कंपनी तामिळाडूच्या होसुरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस या प्रकल्पातून उत्पादन सुरु करण्याचा विचार कंपनीचा आहे. पुढील दोन वर्षांत कंपनी देशभरात आपली उपस्थिती लावण्यासाठी 350 कोटी रुपये गुंतविण्याची शक्यता आहे. एक भांडवलाच्या बाबतीतच कंपनी ओलापेक्षा मागे आहे.
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज