शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सर्वात वजनदार 'सिंपल वन' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फुल चार्जमध्ये धावेल 212 किमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 7:33 PM

Simple One Electric Scooter : कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, त्यानंतर ती बाजारात दाखल झाली आहे.

सिंपल एनर्जीने अखेर 'One' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. लेटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. सिंपल वन 15 ऑगस्ट 2021 रोजी सादर करण्यात आला. म्हणजेच दीड वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, त्यानंतर ती बाजारात दाखल झाली आहे. 

सिंपल वनच्या लाँच झाल्यापासून आतापर्यंत एक लाखाहून अधिक बुकिंग झाले आहेत. देशभरातील लोकांना ही इलेक्ट्रिक स्कूटर खूप आवडल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. सिंपल एनर्जी सर्वात आधी प्री-बुक ऑर्डर्सची डिलिव्हरी करणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी बंगळुरू येथून 6 जूनपासून सुरू होईल. कंपनी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी करणार आहे.

परफॉर्मेंसबद्दल बोलायचे तर, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्युअल-बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. यामध्ये एक फिक्स बॅटरी आहे तर दुसरी रिम्यूव्हेबल आहे. बॅटरी पॅकची एकूण क्षमता 5kWh आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरली जाणारी ही सर्वात पॉवरफूल बॅटरी असण्याची शक्यता आहे. एवढ्या पॉवरसह, सिंपल वन स्कूटकर फुल चार्ज झाल्यावर 212 किमी अंतर कापू शकते. घरात बॅटरी पॅक 5 तास 54 मिनिटांत  0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो. 

जर तुम्हाला 750 पोर्टेबल फास्ट चार्जर घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 13,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. या स्कूटरमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन इंटरफेस आहे, जो कनेक्टिव्हिटी आणि सर्व स्मार्ट फीचर्सना सपोर्ट करेल. याशिवाय बॅटरी पॅकशी संबंधित माहितीही मिळेल. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सहा कलरच्या ऑप्शनसह येतो. यामध्ये ब्रॅझन ब्लॅक, नम्मा रेड, एज्यूर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि दोन स्पेशल कलर ब्रेजन एक्स आणि लाइट एक्स असतील.

सर्वात वजनदार इलेक्ट्रिक स्कूटरसिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर मल्टिपल राइडिंग मोडसह लाँच करण्यात आली आहे. यात इको, राइड, डॅश आणि सोनिक राइड मोड मिळतील. सोनिक मोडमध्ये सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 2.77 सेकंदात 0-40km/h चा स्पीड घेऊ शकते. या सेगमेंटमधील ही सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरचे वजन (कर्ब वेट) 134kg आहे, म्हणजेच ही कदाचित भारतात विकली जाणारी सर्वात वजनदार इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड