नवी दिल्ली : Skoda Auto India (स्कोडा ऑटो इंडिया) ने आपली बहुप्रतिक्षित मेड इन इंडिया कॉम्पॅक्ट एसयुव्ही स्कोडा कुशक (Skoda Kushaq) जगभरासह भारतात लाँच केली आहे. या कारचे कॉन्सेप्ट मॉडेल ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) मध्ये Vision IN म्हणून दाखविले होते. गेल्या महिन्यात स्कोडाने या कारच्या नावावरून पडदा हटविला होता. महत्वाचे म्हमजे या एसयुव्हीचे 95 टक्के भाग हे भारतातच बनविण्यात येणार आहेत. कंपनी ही कार परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. (Skoda Kushaq is Similar to Hyundai Creta and Kia Seltos, it is expected to be priced between Rs 9 lakh and Rs 15 lakh.)
भारतीय बाजारात ही एसयुव्ही लवकरच लाँच होणार आहे. या एसयुव्हीचे नाव एकदम खास आहे. कारण Kushaq हे नाव संस्कृत भाषेतील आहेत. या नावाचा अर्थ एक सम्राट किंवा राजा असा होतो. Skoda Kushaq भारतीय बाजारात पाच रंगात उपलब्ध होणार आहे. कँडी व्हाइट, ब्रिलियंट सिल्वर, कार्बन स्टील, हनी ऑरेंज आणि टोमेटो रेड असे रंग आहेत.
स्कोडा कंपनीची ही कार भारतात 2.0 प्रोजेक्टअंतर्गत स्कोडा आणि फॉक्सवेगन ब्रँडच्या अभियानांतर्गत लॉन्च करण्यात येईल. हे मॉडेल या दोन्ही कंपन्यांच्या प्रोजेक्टअंतर्गत लॉन्च होणाऱ्या चार मॉडेल्सपैकी एक आहे. कंपनीने या मिड साइझ एसयूव्हीला तिच्या नावाला शोभेल, असा बोल्ड आणि अॅग्रेसिव्ह लूक दिला आहे.नव्या स्कोडा कुशकची लांबी 4,221 मिलीमीटर, रुंदी 1,760 मिलीमीटर आणि 1,612 मिलीमीटर आहे. ही या सेगमेंटधील एकमेव अशी कार आहे जिला सर्वाधिक 2,651 मिलीमीटर व्हीलबेस देण्यात आला आहे. या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 188 मिलीमीटर एवढा आहे.
इंजिन आणि ताकदSkoda Kushaq मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात येणार आहेत. ही एसयुव्ही दोन पेट्रोल इंजिनसह भारतीय बाजारात आणली जाणार आहे. यामध्ये 1.0 लीटर, 3 सिलिंडर TSI आणि 1.5-लीटर, 4-सिलिंडर TSI इंजिन देण्यात आले आहे. याचे 1.0 लीटरचे 3 सिलिंडरचे इंजिन 113 bhp ताकद निर्माण करते. तर 1.5-लीटर, 4-सिलिंडर TSI इंजिन 147 bhp ताकद निर्माण करते. दोन्ही इंजिनामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड मिळणार आहे. 1.0 लीटर, TSI मध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि 1.5-लीटर TSI मध्ये 7-स्पीड DSG चा पर्याय असणार आहे.
फिचर्सचा विचार करता, या कारमध्ये एक माठे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, एक ऑल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोलचा प्रयोग करण्यात येणार आहे. याशिवाय यात, इन-कार कनेक्टिव्हिटी टेक, पूश-बटन स्टार्ट/स्टॉप, सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आदिंचाही समावेश असेल.