जर आपण भारतात फुल साइज SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्याकडे फारसे पर्याय नाहीत. फोर्ड गेल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरच्या विक्रीत वाढ झाली आहे. यातच आता स्कोडाने जानेवारी महिन्यात आपली कोडियाक (Kodiaq) लॉन्च केली आहे. लॉन्चिंगनंतर या एसयूव्हीचे सर्व युनिट्स विकले गेले होते. आता कंपनीने पुन्हा एकदा एस एसयूव्हीची बुकिंग सुरू केली आहे. यानुसार आता ग्राहकांना ही एसयूव्ही केवळ 50 हजार रुपयांतच बूक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला कंपनीच्या डीलरशिपकडे संपर्क साधावा लागेल.
बुकिंगसोबतच, कंपनीने आपल्या स्कोडा कोडियाक प्रिमियम एसयूव्हीच्या नव्या किमतीही जाहीर केल्या आहेत. या एसयूव्हीच्या बेस व्हेरिअंट स्टाईलची किंमत आता 37.49 लाख रुपये झाली आहे. तर L&K या टॉप व्हेरिअंटची किंमत 39.99 लाख रुपये एवढी असेल. या नव्या किमतीनुसार, आता कोडियाक 1.5 लाख रुपयांनी महागली आहे. नव्या बुकिंगची डिलिव्हरी जानेवारी 2013 पर्यंत केले जाईल.
9 एअबॅग्ससह खास फीचर्स - इंजिनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या गाडीला 2.0 -लिटरचे टीएसआय टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 188 बीएचपी आणि 320 एनएम जेनरेट करते. हे इंजिन 7- स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. यात ऑल-व्हील ड्राइव्हही मिळते. या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड सेफ्टी फीचर्समध्ये 9 एअरबॅग्स, ESC, अँटी-स्लिप रेग्युलेशन, रिअर-व्ह्यु कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेंसरचाही समावेश आहे.
दमदार फीचर्स -या कारमध्ये LED हेडलॅम्प्स, ऑटोहेडलॅम्प्स आणि वायपर्स, ऑटो डिमिंग मिरर, panoramic sunroof, 18 इंचांचे अलॉय व्हील, लेदर अपहॉल्स्ट्री, ambient lighting, हँड्स फ्री पार्किंग, 8 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम आणि 3 झोन क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे.