Skoda Kushaq CNG: भारतीय सीएनजी कार सेगमेंटमध्ये आणखी एक कार एंट्री घेण्याची तयारी करत आहे. युरोपियन ऑटोमोबाईल कंपनी स्कोडा लवकरच Kushaq SUV चे CNG व्हर्जन लॉन्च करू शकते. जर ही कार सीएनजी ऑप्शनमध्ये आली तर कार चालवण्याचा खर्च कमी होईल आणि तुमचे पैसेही वाचतील. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता लोक सीएनजी कारला खूप पसंती देत आहेत. कार कंपन्या बाजारातील मागणीनुसार नवीन सीएनजी कारचाही समावेश करत आहेत. Hyundai आणि Kia देखील या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहेत.
नुकतीच महाराष्ट्रात स्कोडा कुशक सीएनजी कार दिसली आहे. रिपोर्टनुसार कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सीएनजी किटच्या सहाय्याने रोड टेस्टिंग करण्यात आली आहे. इंधनाचे दर लक्षात घेऊन कार कंपन्या लोकप्रिय मॉडेल्सचे सीएनजी प्रकार बाजारात आणत आहेत. Skoda Kushaq ही कंपनीची भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. त्यामुळे कंपनी सर्वातआधी याच कारचं सीएनजी व्हर्जन बाजारात आणू शकते.
Kushaq CNG ची वैशिष्ट्यसी-सेगमेंट सेडान स्कोडा रॅपिडची सीएनजी व्हर्जनची कार एका सीएनजी स्टेशनवर दिसली होती. आता कंपनीच्या आगामी CNG कारच्या यादीत Skoda Kushaq चे नाव देखील जोडले जाणार आहे. जर युरोपियन ऑटो दिग्गज कंपनीने कुशकला CNG आवृत्ती दिली, तर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि कंपनीने फिट केलेले CNG किट असलेली ही पहिली कार ठरेल.
Kushaq चे स्पेसिफिकेशन्ससध्या Skoda Kushaq दोन टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. यात १.० लिटर तीन सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन आणि १.५ लिटर चार सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. त्याच वेळी ६ स्पीड ऑटोमॅटिक, ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड DSG पर्याय या आलिशान SUV मध्ये ट्रान्समिशन म्हणून उपलब्ध आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये Kushaq SUV च्या एकूण २,००९ युनिट्सची विक्री झाली आहे.