शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Skoda Slavia भारतात होणार लाँच, Honda City आणि Maruti Ciaz ला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 9:32 AM

Skoda Slavia launch Update: भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर स्कोडाची स्लाव्हिया ही होंडाची प्रसिद्ध सिडान कार होंडा सिटी आणि मारुतीच्या सियाझ यांना टक्कर देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

Skoda Slavia launch Update: चेक प्रजासत्ताकमधील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी स्कोडा भारतात आपल्या आगामी स्लाव्हिया सिडान कारवरून (Skoda Slavia) बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. स्कोडाची ही कार या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, नवीन स्लाव्हियाचे अधिकृतपणे 18 नोव्हेंबर रोजी अनावरण केले जाईल. दरम्यान, याआधी स्लाव्हिया सिडान कारचे अधिकृत टीझरचे फोटो समोर आले आहेत. चला तर जाणून घेऊया, या कारची खासियत... (Skoda Slavia Compact Sedan To Be Unveiled In India On November 18)

Kushaq आणि Taigun SUV प्लॅटफॉर्मवर तयार होणार स्कोडा स्लाव्हियाची लांबी 4,541 मिमी, रुंदी 1,752 मिमी आणि उंची 1,487 मिमी आहे. ही सेडान 2,651 मिमीच्या व्हीलबेससह येईल. डायमेंशनच्या आकडांनुसार, स्लाव्हिया आपल्या सेंगमेंटमधीस सर्वात रुंद कार असेल आणि यामध्ये सेगमेंटचा सर्वात लांब व्हीलबेस देखील असेल. कंपनीने हे MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे, जे नवीन पिढीच्या Skoda आणि Volkswagen कार जसे की Kushaq आणि Taigun SUVs शेअर करते. स्लाव्हियाला भारतातील कार निर्मितीच्या लोकप्रिय सेडान रॅपिडची रिप्लेसमेंट म्हणून ओळखली जाते.

दोन इंजिनचा मिळेल पर्याय दरम्यान, चेक प्रजासत्ताकमधील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी स्कोडाने आपल्या नवीन स्लाव्हिया कारबाबत अधिक माहिती उघड केली नाही. मात्र, या कारमध्ये दोन TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असल्याची पुष्टी केली आहे. ज्यामध्ये 1.0-लिटर तीन-सिलिंडर TSI इंजिन 115 hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. तसेच, 1.5-लिटर चार-सिलिंडर TSI चे आऊटपुट 150  hp पर्यंत करेल.

या इंजिनांसह, ही स्कोडा कार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. मात्र, एक ऑटोमॅटिक किंवा सात-स्पीड DSG गिअरबॉक्स देखील पर्याय म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर स्कोडाची स्लाव्हिया ही होंडाची प्रसिद्ध सिडान कार होंडा सिटी आणि मारुतीच्या सियाझ यांना टक्कर देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :AutomobileवाहनSkodaस्कोडा