जगातील सर्वात प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी Erik Buell ने इलेक्ट्रीक ब्रँड FUELL द्वारे दोन इलेक्ट्रीक सायकल लाँच केल्या आहेत. यापैकी एका सायकलची रेंज एवढी आहे की मुंबई-पुणे-मुंबई दौरा एकाच चार्जमध्ये करता येणार आहे. वाचून आश्चर्यचकीत झालात ना, पण हे खरे आहे. फ्यएल ब्रँडने Flluid-2 आणि Flluid-3 नावाने दोन सायकल लाँच केल्या आहेत. कंपनी या ई सायकलकडे ई बाईक्सच्या रिप्लेसमेंट म्हणून पाहत आहे.
या सायकलमध्ये 7-स्पीड गियर आणि हेडलाईटसह हँडलबारवर 2.3 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये वेग, बॅटरी स्टेटस, असिस्टेंस मोड, गियर पोजिशन, ब्लूटूथ आणि लॉक आदीची माहिती दिली जाणार आहे. तसेच यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी, रिमोट लॉक/अनलॉक, एंटी थेफ्ट वॉर्निंग सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. जागतिक बाजारांत या सायकलना ई बाईक्स म्हटले जाते.
Flluid-2 मध्ये कंपनीने अल्ट्रा रेंज 2 kWh ची क्षमता असलेल्या दोन रिमुव्हेबल बॅटरी दिल्या आहेत. या बॅटरी एकदा चार्ज केल्या की त्या ३५० किमीची रेंज देतात असा दावा आहे. Flluid-3 मध्ये कंपनीने 1 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जला 180 किलोमीटरची रेंज देते. यामध्ये कंपनीने 2000 Wh च्या बॅटरीचा वापर केला आहे. या बॅटरी ४ तासांत ८० टक्के आणि सहा तासांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीचा आहे.
या ई बाईक युरोप आणि अमेरिकी बाजारात लाँच करण्यात आल्या असून काही ठिकाणी नियमांनुसार टॉप स्पीड २५ ते ४५ किमी प्रति तास आहे. या बाईक्सची किंमत 3.28 लाख रुपयांपासून सुरु होते.