Solar Powered Electric Cars: गेल्या काही वर्षात भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक कारला प्रमोटही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची भारतात कमतरता आहे, त्यामुळेच सामान्य कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार कमी आहेत.याउलट परदेशात कंपन्यां चार्जिंग सिस्टीम दूर करण्याचा मार्ग शोधत आहेत. या अंतर्गत सुर्यावर चार्ज होणाऱ्या गाड्यांवर कामही सुरू झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या सुर्यावर चार्ज होणाऱ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या काही इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कार आहेत.
Aptera Paradigm
Aptera Paradigm कॉर्पोरेशन ने Aptera Paradigm नावाची सोलर इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. Aptera Paradigm 25.0 kWh ते 100.0 kWh पर्यंतच्या बॅटरीपॅकमध्ये उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये 134 bhp ते 201 bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. ही केवळ 3.5 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. ही तीन चाकी इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीवर सोलर पॅनल बसवले असल्याने कार सूर्यप्रकाशाने चार्ज होते. एका चार्जवर ही गाडी 1000 मैल किंवा सुमारे 1,600 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
Humble One
ही सौर उर्जेवर चालणारी एक शक्तिशाली इलेक्ट्रिक कार आहे. कॅलिफोर्नियास्थित स्टार्ट-अप कंपनी हंबल मोटर्सने ही कार विकसित केली आहे. हंबल वनला सौर छत, वीजनिर्मिती करणारे साइड लाइट्स, पीअर-टू-पीअर चार्जिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि बॅटरी चार्जिंगसाठी फोल्ड-आउट सोलर अॅरे विंग्स मिळतात. या सर्वांच्या मदतीने एसयूव्हीची बॅटरी सहज चार्ज होत राहते. त्याची रचना अतिशय अनोखी आहे. ही कार सामान्य कारपेक्षा खूपच वेगळी दिसते. त्यात सूर्याची किरणे शोषून घेण्याची प्रचंड शक्ती आहे.