सोनी ही कंपनी कोणाला माहिती नसेल. उत्पादने महागडी असली तरी या कंपनीचे नाव मात्र सर्वांच्या नजरेत आलेले आहे. सोनी ही कंपनी स्वत: संशोधन करते, यामुळे तिची उत्पादने खूप महाग असतात. सोनीची म्युझिक सिस्टिम तर सर्वांनाच माहिती आहे. आता हीच कंपनी लवकरच ईलेक्ट्रीक कारच्या जगात पाऊल ठेवणार आहे.
सोनीने यासाठी होंडा मोटर्ससोबत पार्टनरशीप केली आहे. सोनीची ही पहिली वहिली कार २०२६ पर्यंत लाँच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोनी होंडा मोबिलिटीची इलेक्ट्रिक कार अमेरिका आणि युरोपमध्ये ऑनलाइन सेल मॉडेलद्वारे उतरविली जाईल. ही कार भारतात पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सोनी आणि होंडा या वर्षी जूनमध्ये इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी एकत्र आले आहेत. या करारानुसार सोनी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सवर काम करेल, म्हणजेच सोनी या नवीन कारसाठी ऑनबोर्ड कंट्रोलर्सपासून क्लाउड-आधारित सेवांपर्यंत सॉफ्टवेअर प्रणाली प्रदान करेल. होंडा कारची बॉडी, बॅटरी प्रणालीवर काम करेल. या कारचे सध्याचे नाव व्हिजन-एस02 असे आहे. ही कार लेव्हल 3 ऑटोनॉमस ड्राइव्ह सिस्टमसह येण्याची शक्यता आहे.
Vision-S02 हा एक ड्युअल-इलेक्ट्रिक मोटर सेटअप आहे, जो 268hp पॉवर जनरेट करण्याची क्षमता ठेवतो. एका चार्जवर ही कार 180 किमी प्रतितास वेगाने चालविली जाऊ शकते. या ई-कारमध्ये ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमही मिळण्याची शक्यता आहे.