नवी दिल्ली : लवकरच 2021 हे यंदाचे वर्ष संपणार आहे. यातच कार खरेदीवर प्रचंड सूट मिळणार आहे. टाटा (Tata) ते महिंद्रा (Mahindra) आणि ह्युंदाईपासून (Hyundai) मारुती सुझुकीपर्यंत (Maruti Suzuki) सर्वच कंपन्या कार खरेदीवर भरघोस सूट देत आहेत. इन्व्हेंटरी रिकामे करण्यासाठी असे केले जात आहे. जानेवारीत वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. बाजारात चार SUV कारवर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
रेनो डस्टर (Renault Duster)रेनो डस्टर एसयूव्हीवर (Renault Duster SUV) वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत कमाल सूट मिळत आहे. रेनो डस्टर एसयूव्ही खरेदी केल्यास 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 50,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट लाभ मिळतील. रेनो डस्टर एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये पहिले इंजिन 106hp आणि दुसरे इंजिन 156hp चे आहे.
निसान किक्स (Nissan Kicks SUV)निसान किक्स (Nissan Kicks SUV) कार खरेदीवर तुम्हाला कमाल 1 लाख रुपयांची सवलत मिळेल. निसान किक्स एसयूव्ही खरेदी केल्यावर 70,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट बेनिफिट दिले जातील. ऑनलाइन बुकिंग केल्यावर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. निसान किक्स एसयूव्हीमध्ये 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5लीटर पेट्रोल इंजिन देखील आहे.
महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300)दुसरीकडे, महिंद्राची XUV300 खरेदी केल्यास, तुम्हाला कमाल 69 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. Mahindra XUV300 खरेदी केल्यावर, तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 4,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे मिळतील.
महिंद्रा KUV100 (Mahindra KUV100)महिंद्राची आणखी एक कार आहे, जी तुम्ही खरेदी करून प्रचंड सूट मिळवू शकता. Mahindra KUV100 खरेदी केल्यावर तुम्हाला 38 हजार 55 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बेनिफिट मिळेल. महिंद्रा KUV100 मध्ये 1.2 लीटरचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, ज्याची 83hp क्षमता आहे.