शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

रॉयल एनफिल्डकडून Super Meteor 650 ची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व व्हेरिएंटची किंमत व कलर ऑप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 3:12 PM

Super Meteor 650 Price : तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे, ज्यांची किंमत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) दीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या नवीन क्रूझर बाईक Super Meteor 650 च्या किमती जाहीर केल्या आहेत. ही बाईक तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे, ज्यांची किंमत स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे.

व्हेरिएंट काय आहेत?रॉयल एनफिल्डने या बाईकचे तीन व्हेरिएंट बाजारात लाँच केले आहेत, ज्यात पहिले व्हेरिएंट Super Meteor 650 Astral, दुसरे व्हेरिएंट Super Meteor 650 Interstellar आणि तिसरे व्हेरिएंट Super Meteor 650 Celestial आहे.

किंमत किती?रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) सुपर मेटिअर 650 ची किंमत आपल्या व्हेरिएंटच्या आधारावर निश्चित केली आहे. Super Meteor 650 Astral ची किंमत 3.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. Super Meteor 650 Interstellar ची किंमत 3.63 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. Super Meteor 650 Celestial ची किंमत 3.78 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन कसे आहे?रॉयल एनफिल्डने या बाईकमध्ये गियर मॅपिंग आणि काही अपडेट्ससह तेच इंजिन वापरले आहे, जे कंपनीने आपल्या दोन सध्याच्या बाईक Royal Enfield Interceptor 650 आणि Royal Enfield Continental GT 650 मध्ये दिले आहे. या बाइकचे इंजिन 648cc पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे एअर कूल्ड आणि ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे इंजिन 47 बीएचपी पॉवर आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

कलर ऑप्शन काय आहेत?किमतींप्रमाणेच रॉयल एनफिल्डने व्हेरिएंटनुसार कलरचा ऑप्शनही वेगळा ठेवला आहे. ज्यामध्ये Super Meteor 650 Astral साठी ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शन ठेवण्यात आले आहेत. तर Super Meteor 650 Interstellar साठी ड्युअल टोन ऑप्शन आहे. ज्यामध्ये ग्रे आणि ग्रीन कलरचा समावेश आहे. Super Meteor 650 Celestial मध्ये देखील कंपनी ड्युअल कलर टोनचा ऑप्शन देत आहे, ज्यामध्ये रेड आणि ब्लू कलर ऑप्शन मिळेल.

ब्रेकिंग सिस्टम?रॉयल एनफिल्डने या बाईकच्या फ्रंटला 320 एमएम डिस्क ब्रेक आणि रिअर बाजूस 300 एमएम डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यात ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहन