शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

तरुणांसाठी नवीन स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक येणार, 110 Kmph असणार टॉप स्पीड!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 7:43 PM

Svitch CSR 762 electric bike : कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल, तर ती 120 किमीची रेंज देईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचा व्हीलबेस 1,430 मिमी असेल आणि बाईकचे वजन 155 किलो आहे.

नवी दिल्ली : नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Svitch MotoCorp भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. या बाईकचे नाव CSR 762 असे म्हटले जात आहे. ही बाईक यावर्षी जुलै-ऑगस्टपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. CSR 762 एक पॉवरफुल 3 kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवली जाणारी बाईक असणार आहे. यामध्ये 3.7 kWh चा बॅटरी पॅक दिला जाणार आहे. CSR 762 ची किंमत जवळपास 1.65 लाख रुपये असेल (सब्सिडी वगळून). मात्र, कंपनी या बाईकवर 40,000 रुपयांपर्यंत सब्सिडी लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल, तर ती 120 किमीची रेंज देईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचा व्हीलबेस 1,430 मिमी असेल आणि बाईकचे वजन 155 किलो आहे. बाईकच्या सीटची उंची 780 मिमी असणार आहे. याशिवाय बाईकमध्ये 6 रायडिंग मोड्स पाहायला मिळतील. तसेच, ब्रँड अधिक व्यावहारिकतेसाठी बॅटरी स्वॅपिंग जॉइंट्स स्थापित करण्यास उत्सुक आहे.

'सर्वसामान्यांसाठी लक्झरी बाईक आहे'CSR 762 च्या आगामी लॉन्च बद्दल बोलताना स्विचचे संस्थापक राजकुमार पटेल म्हणाले, "आम्ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला इलेक्ट्रिक बदलासह सुधारण्याचे ध्येय ठेवले आहे. CSR 762 एक कंप्लिट ऑन-रोड राइडिंग अनुभव देते. सर्वसामान्यांसाठी ही खऱ्या अर्थाने लक्झरी बाईक आहे. CSR 762 तयार करण्याचा उद्देश बाइकिंग उत्साही व्यक्तींना लक्झरी, स्टाइल आणि सस्टेनेबिलीटी देणे हा आहे."

25 एप्रिलपासून या इलेक्ट्रिक बाईकचे बुकिंग Revolt Motors ने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक RV400 चे बुकिंग सुरु केले आहे. 25 एप्रिलपासून 20 शहरांमध्ये याची सुरुवात झाली आहे. ग्राहक रिव्हॉल्ट मोटर्सच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतात आणि 9,999 रुपये भरून ते बुक करू शकतात. रिव्हॉल्ट मोटर्सचे नेटवर्क वाढवण्याची आणि 40 हून अधिक डीलरशिप उघडण्याची योजना आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbusinessव्यवसाय