शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

इलेक्ट्रिक वाहनांवर 'येथे' येणार बंदी; हिवाळ्यामुळे का घ्यावा लागला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 8:15 AM

स्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे. बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते.

प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात इलेक्ट्रिक वाहनांना जगभर प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातही या वाहनांची खरेदी जवळपास ८०० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, एक देश असा आहे जिथे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याची तयारी चालविली आहे. हा देश आहे स्वित्झर्लंड. हा निर्णय झाल्यास स्वित्झर्लंडची इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालणारा एकमेव देश ठरेल.

कशामुळे बंदीचा निर्णय?स्वित्झर्लंडमध्ये हिवाळ्यात तापमान शून्याच्या खूपच खाली जाते. घरे गरम ठेवण्यासाठी विजेवर चालणारे हिटर तेथे वापरले जातात. संपूर्ण देशात बर्फवृष्टी होत असल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. वीजटंचाईची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा विचार तेथील सरकार करीत आहे. 

बंदीमुळे काय होणार?वीजटंचाई लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगवर बंदी घातली जाऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांवरील बंदीमुळे जी वीज वाचेल तिचा वापर घरांतील वीजपुरवठ्यासाठी केला जाईल. त्यामुळे लोकांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळेल, असे स्वित्झर्लंडची वीज नियामकीय संस्था एलकॉमने म्हटले आहे.

विजेसाठी अन्य देशांवर अवलंबूनस्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे. बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते. युरोपातील काही देश आताच वीजटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात स्वित्झर्लंडला पुरेशी वीज मिळण्याची शक्यता कमी आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणामरशिया-आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपीय देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युरोपला मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करतात. युरोपमध्ये हिवाळ्यात वीजनिर्मितीसाठी गॅसचा वापर होतो. 

स्वीस फेडरल इलेक्ट्रिसिटी कमिशनने जूनमध्येच एक निवेदन जारी करून हिवाळ्यात वीजटंचाईचे संकट येऊ शकते, असा इशारा दिला होता. फ्रान्समधील अणुऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा थांबल्यामुळे देशावर वीजटंचाईचे संकट घोंघावत आहे, असे कमिशनने म्हटले होते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर