ENTOP Mada 9 Simurgh Supercar: तालिबानचे राज्य असलेल्या अफगाणिस्तानची गणना जगातील सर्वात गरीब देशांमध्ये केली जाते. ही ओळख बदलण्यासाठी अफगाणिस्तान आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठीच आता अफगाणिस्तानमधील कार कंपनी ENTOP ने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये Simurgh Supercar सादर केली आहे. तालिबान शासित अफगाणिस्तानात बनवलेली ही पहिली सुपरकार आहे. काबुलस्थित ऑटो कंपनी ENTOP आणि अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्यूट (ATVI) ने मिळून अफगाणिस्तानातील पहिली मेड-इन-सुपरकार तयार केली आहे.
जिनिव्हा मोटर शोमध्ये Simurgh Supercar वर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हा जगातील सर्वात महत्त्वाचा मोटर शो आहे. अशा कार्यक्रमात तालिबान शासित अफगाणिस्तानातील पहिल्या सुपरकारचे अनावरण होणे, ही मोठी गोष्ट आहे. काळ्या रंगाची थीम आणि अप्रतिम डिझाइनसह, Simurgh Supercar ने जगातील टॉप ऑटो ब्रँड्सच्या सुपरकार्सना स्पर्धा दिली.
ENTOP Simurgh: इंजिनSimurgh Supercar ची रचना 30 अफगाण इंजिनीअर्सने केल्याचा दावा करण्यात आला आहे. तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये ही सुपरकार बनवण्यात आली आहे. यात कंपनीने 1.8 लिटर DOHC 16 व्हॉल्व्ह VVT-i, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे 2004 जनरेशन टोयोटा कोरोलाचे इंजिन आहे.
ENTOP Simurgh: डिझाइनमीडिया रिपोर्ट्सनुसार, ENTOP चे म्हणणे आहे की, सुपरकारसाठी टोयोटाच्या इंजिनमध्ये बदल करण्यात आला आहे. आता डिझाईनबद्दल बोलायचे झाले, तर ही कार मर्सिडीज-बीएमडब्ल्यू सारख्या दिग्गजांशी स्पर्धा करते. फ्रंट ग्रिलवर एलईडी हेडलॅम्प दिसतात. कारमध्ये एक शार्प फ्रंट स्प्लिटर, मोठी काळी अलॉय व्हील्स, फ्लेर्ड फेंडर्स, एलईडी टेललाइट्स आणि डिफ्यूझर आहे.
Mada 9 ची अपग्रेड केलेली आवृत्तीENTOP ने दावा केला आहे की, Simurgh प्रत्यक्षात Mada 9 आहे, ज्याचे यावर्षी अनावरण करण्यात आले होते. Simurgh ही एक प्रोटोटाइप SUV आहे, जी Mada 9 च्या एक पाऊल पुढे आहे. कंपनीने सांगितले, की भविष्यात सिमर्गचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. यासाठी थोडा वेळ लागेल, कारण कंपनीला आर्थिक मदतीची गरज आहे.