शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 5:55 PM

Tata Altroz Racer : अल्ट्रोझ रेसरला ड्युअल टोन कलर स्कीम, रेसिंग स्ट्रिप्ससह टॉप आणि बोनेट, अल्ट्रोझ रेसर बॅज मिळेल.

नवी दिल्ली : टाटा मोटर्स पुढील महिन्यात जूनमध्ये अल्ट्रोझ रेसर (Altroz ​​Racer) लाँच करणार आहे. कंपनीने या कारचा पहिला टीझर रिलीज केला आहे. त्यानुसार, ही कार सध्याच्या Altroz ​​ची स्पोर्टी व्हर्जन असणार आहे. अल्ट्रोझ रेसरला ड्युअल टोन कलर स्कीम, रेसिंग स्ट्रिप्ससह टॉप आणि बोनेट, अल्ट्रोझ रेसर बॅज मिळेल. या कारला मागील बाजूस नवीन स्पॉयलर मिळेल. 

कारच्या इंटिरिअरमध्ये सर्व ब्लॅक इंटीरियर थीम आणि रेड टच दिला जाईल. टाटा अल्ट्रोझ रेसर व्हर्जनची लांबी 3990mm, रुंदी 1755mm, उंची 1523mm आणि व्हीलबेस 2501mm असेल. यात 16 इंची व्हील्स देण्यात येणार आहेत. लाँच झाल्यानंतर या कारची स्पर्धा Hyundai i20 N Line आणि Maruti Suzuki Suzuki Fronx Turbo सारख्या कारसोबत होईल.

Tata Altroz Racer इंजिननवीन अल्ट्रोझ ​मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 120bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करेल. मात्र, या मॉडेलमध्ये फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय असणार आहे. त्याची अल्ट्रोझ ​​रेसर जवळपास Hyundai i20 N Line सारखीच शक्तिशाली असेल. Hyundai i20 N Line मध्ये 1.0 लीटर, 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 120bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. तर Maruti Suzuki Frontis Turbo मध्ये 1.0 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 100bhp पॉवर आणि 148Nm टॉर्क जनरेट करते.

Tata Altroz Racer ची किंमतसध्या अल्ट्रोज रेसरची किंमत अजून जाहीर केलेली नाही. कारची किंमत 10 लाखांच्या आसपास ठेवली जाण्याची शक्यता आहे. तर Hyundai i20 N Line ची किंमत 9.99 लाख ते 11.49 लाख रुपये आहे. तसेच, Maruti Frontex Turbo ची किंमत 9.72 लाख ते 13.04 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

Tata Altroz बद्दल जाणून घ्या...   टाटा अल्ट्रोझच्या नॉर्मल मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर यात 3 इंजिनांचा पर्याय आहे. एक म्हणजे 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे 88PS/ 115Nm आउटपुट देते. दुसरे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 110PS/ 140Nm आउटपुट देते. तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे, जे 90PS/ 200Nm आउटपुट देते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) चा पर्याय उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.65 लाख ते 10.80 लाख रुपये आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार