नवी दिल्ली : देशात मिड साइज एसयूव्ही ( SUV) सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कार विकल्या जातात. या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटाचे (Hyundai Creta) वर्चस्व दीर्घकाळापासून अबाधित आहे. या सेगमेंटमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार किया सेल्टोस (Kia Seltos) आहे. पण आता लवकरच टाटा मोटर्सही (Tata Motors) या सेगमेंटमध्ये पाऊल टाकणार आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos ची बाजारपेठ काबीज करण्यासाठी टाटा लवकरच बाजारात आपली सर्वोत्तम एसयूव्ही लाँच करणार आहे. या एसयूव्हीचे नाव ब्लॅकबर्ड (Blackbird SUV) असण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी नवीन एसयूव्ही सध्याच्या नेक्सॉनवर (Nexon) आधारित असणार आहे. पण याची लांबी नेक्सॉन पेक्षा जवळपास 4.3 मीटर जास्त असेल. कंपनी या नवीन वाहनाला ब्लॅकबर्ड असे नाव देऊ शकते. मात्र हे नाव फायनल नसून कंपनी यात बदलही करू शकते. सर्वाधिक विकली जाणारी कंपनीची कार नेक्सॉनच्या X1 प्लॅटफॉर्मवर आगामी ब्लॅकबर्ड एसयूव्ही तयार केली जाऊ शकते. पण, याचा आकार मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात अधिक जागा आणि अधिक बूट स्पेस पाहायला मिळेल. तसेच, एसयूव्हीची डिझाइन नवीन असू शकते आणि याचा पुढचा आणि मागचा लूक वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
कसे असेल इंजिन? या कारमध्ये नवीन 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. जे नेक्सॉनमध्ये असलेल्या 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिनपेक्षा मोठे आणि अधिक पॉवरफुल असणार आहे. हे इंजिन 160 hp पॉवर जनरेट करेल. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळू शकतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
क्रेटाशी होणार स्पर्धाआगामी ब्लॅकबर्ड भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल. ही कार तीन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1.5-लिटर MPI पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन आणि 1.4-लिटर कप्पा टर्बो GDI पेट्रोल समाविष्ट आहे. जे अनुक्रमे 113bhp आणि 143.8Nm, 113bhp आणि 250Nm आणि 138bhp चे आउटपुट जनरेट करतात. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.