Tata Cars Bharat NCAP Crash Test : सध्या भारतात TATA च्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. याचे कारण म्हणजे, टाटाच्या गाड्या अतिशय मजबूत आहेत. विशेष म्हणजे, ग्लोबल NCAP कार क्रॅश चाचणीमध्ये कंपनीच्या गाड्यांनी चांगली रेटिंग्स मिळवल्यानंतर, आता भारत NCAP चाचणीमध्येही टाटाच्या EV कार्सनी चांगली कामगिरी केली आहे. Tata Nexon EV आणि Tata Punch EV यांना भारत NCAP क्रॅश चाचणीत 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या दोन्ही कार्सने अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये ही रेटिंग मिळाली आहे.
Nexon EV मध्ये फ्रंटल-साइड हेड कर्टेन, साइड चेस्ट एअरबॅग, बेल्ट रिमाइंडर, Isofix अँकर पॉइंट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात. तर Punch EV मध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, Isofix माउंट, 6 एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी थ्री पॉइंट सीट बेल्ट, यांसारखे सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात.
Nexon EV अडल्ट सुरक्षेत Nexon EV ला 32 पैकी 29.86 गुण मिळाले आहेत, तर चाईल्ड सुरक्षेत 24 पैकी 23.95 गुण मिळाले आहेत. फ्रंटल टेस्टमध्ये कारला 16 पैकी 14.26 , तर साइड टेस्टिंगमध्ये 16 पैकी 15.60 गुण मिळाले आहेत. चाईल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये कारला CRS साठी 12 पैकी 12 गुण मिळाले आहेत, तर व्हिएकल असेसमेंटसाठी 13 पैकी 9 गुण मिळाले आहेत.
Punch EV अडल्ट सुरक्षेत Punch EV ला 32 पैकी 31.46 गुण मिळाले आहेत, तर चाईल्ड सुरक्षित 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. फ्रंटल टेस्टिंगमध्ये 14.26 पॉइंट्स आणि साइड टेस्टिंगसाठी 15.6 पॉइंट मिळाले आहेत. याशिवाय, चाईल्ड ऑक्येपेंट प्रोटेक्शनमध्ये 24 पैकी 23.95 गुण मिळाले आहेत.
Nexon EV आणि Punch EV ची रेंज Tata Nexon EV दोन प्रकारात येते. याचे मेडियम मॉडेल 30kWh बॅटरी पॅकसह येते, ज्याची रेंज 325 किलोमीटरपर्यंत आहे. तर, लाँग रेंज मॉडेल 40.5kWh बॅटरी पॅकसह येते, ज्याची रेंज 465 किलोमीटरपर्यंत आहे. पंच EV देखील दोन पर्यायांमध्ये येते. याचे 24kWh बॅटरी पॅक मॉडेल 315 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, तर 35kWh बॅटरी पॅक 421 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.
Nexon EV आणि Punch EV ची किंमतनेक्सॉन इलेक्ट्रिकची किंमत 14.49 लाख ते 19.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर पंच EV ची किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.