शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Jaguar I-Pace: भारतात लाँच झाली जबरदस्त रेंज असलेली इलेक्ट्रिक SUV; एका चार्जमध्ये जाणार 480Kms

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:47 PM

Jaguar I-Pace: पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्देकारच्या बुकिंगला करण्यात आली सुरूवातकारमध्ये देण्यात आले अत्याधुनिक फीचर्स

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटमध्ये आणखी एका दिग्गज प्लेअरची एन्ट्री झाली. जॅग्वार लँड रोवरनं आज भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रीक एसयूव्ही Jaguar I-Pace लाँच केली. जबरदस्त लूक आणि पॉवरफूल इलेक्ट्रीक मोटर असलेली ही कार तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये S, SE आणि HSE यांचा समावेश आहे. या कारची बुकिंगला ऑनलाईनसोबतच डिलरकडूनही करता येऊ शकते. नुकतंच Jaguar I-Pace चं पहिलं युनिट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) वर उतरवण्यात आलं. या कारची लांबी 4682 mm, रूंदी 2011mm आणि उंची 1566 mm इतकी आहे. याव्यतिरिक्त कारचा 2990mm च्या ग्राऊंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. ही कार 12 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये फजी व्हाईट, कॅलडेरा रेड, सॅनेटोर्नी ब्लॅक, यूलॉग व्हाइट, इंडस सिल्वर, फरेंजे रेड, कॅसियम ब्लू, बोर्सको ग्रे, इगर ग्रे, पोर्टोफिनो ब्लू, पर्ल ब्लॅक आणि अरूबा या रंगांचा समावेश आहे. ड्रायव्हिंग रेंजJaguar I-Pace मध्ये कंपनीनं मॅग्नेट इलेक्ट्रीक कार मोटरचा वापर केला आहे. ती 294kW ची पॉवर आणि 696Nm चा टॉर्क जनरेट करते. तसंच यामध्ये ऑल टाईम व्हिल ड्राईव्ह सिस्टमही देण्यात आली आहे. ही कार केवळ 4.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग पकडू शकते. तसंच एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 480 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय या कारमध्ये देण्यात आलेली बॅटरी 90kWh क्षमतेची असून ती ४५ मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज करता येते. 

काय आहेत फीचर्स?कंपनीनं या कारमध्ये अॅडव्हान्स्ड फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये Luxtec स्पोर्ट सीट, 280 वॅटचा मेरिडियन साऊंड सिस्टम, इंटरॅक्टिव्ह ड्रायव्हर डिस्प्ले, 3D सराऊंड कॅमेरा, ड्रायव्हर कंडिशन मॉनिटर, अॅनिमेटेड डायरेक्शन इंडिकेटर्स. 3D सराऊंड साऊंड सिस्टम, हेड अप डिस्प्ले आणि अॅडाप्टिव्ह क्रुझ कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या कारमध्ये 22 इंचाचे अलॉय व्हिल्स, इंटिग्रेटेड एईडी, टाईम रनिंग लाईट, पॅनोरमिक सनरूफही देण्यात आले आहे. Jaguar I-Pace सोबत कंपनी 7.4kW क्षमतेचा एसी चार्जरही कॉम्प्लिमेंट्री देण्यात येत आहे. 11kW च्या चार्जरनं ही कार चार्ज होण्यासाठी या कारला 8.6 तासांचा कालावधी लागतो. तर दुसरीकडे 7.4kW त्या चार्जरनं चार्ज होण्यासाठी या कारला १२ तास लागतात. ही कार निरनिराळ्या व्हेरिअंटमध्ये येते. याच्या एन्ट्री लेव्हल S व्हेरिअंटची किंमत 1.05 कोटी रूपये, SE व्हेरिअंटची किंमत 1.08 कोटी रूपये आणि टॉप व्हेरिअंट HSE ची किंमत 1.12 कोटी रूपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.

टॅग्स :Jaguarजॅग्वारElectric Carइलेक्ट्रिक कारTataटाटाIndiaभारतJNPTजेएनपीटी