टाटा मोटर्सने ऑटो एक्सपो 2023मध्ये नवीन इलेक्ट्रिक मॅजिक ईव्ही सादर केली आहे. गेल्यावर्षीच हिचे अनावरण करण्यात आली होती. अखरे मील डिलिव्हरी सेवेसाठी ती तयार करण्यात आली आहे. याशिवाय ती, शाळा, स्टेज कॅरेज आणि अॅम्ब्युलन्स म्हणूनही वापरता येईल.
टाटा मॅजिक (Tata Magic) ही बऱ्याच वर्षांपासून पॅसेन्जर सेगमेन्टमध्ये एक यशस्वी कॉमर्शिअल व्हेइकल आहे. कंपनीने मॅजिक ईव्ही लॉन्च सोबतच झिरो इमिजन मोबिलिटी प्रदान करते. हा कंपनीच्या कॉमर्शिअल व्हेइकल व्यवसायात 2045 पर्यंत झिरो इमिजनपर्यंत पोहोचण्याच्या कंपनीच्या प्रययत्नांतील एक भाग आहे.
अॅडव्हॉन्स बॅटरी कुलिंग सिस्टिम सोबत येणार EV -टाटा मॅजिक ईव्ही 10 सीटर प्रासी कार आहे. हिच्या डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिची लांबी 3,790mm, रुंदी 1,500mm, तर ही कार 2,100mm लांब व्हीलबेससह येते. तसेच, हिच्या ग्राउंड क्लिअरन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, हिचा ग्राउंड क्लिअरन्स 160mm एवढा आहे. झिरो इमिशन मोबिलिटी साठी एक बेंचमार्क सेट करत टाटा मॅजिक इलेक्ट्रिक 10 सीटर EV एक अॅडव्हॅन्स बॅटरी कूलिंग सिस्टिम आणि एक IP 67 रेटेड वॉटर आणि डस्ट प्रूफ ड्रायव्हिंग सोबत येते.
14 ते 20kWh ची बॅटरी पॅक -हिच्या बॅटरी पॅकसंदर्भात बोलायचे झाल्यास, हिला 14 ते 20kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो जवळपास 90 ते 115Nm एवढा टार्क जनरेट करू शखतो. तो सिंगल स्पीड ट्रान्समिशनसोबत जोडला गेला आहे आणि त्यात त्यात फ्रंट आणि रिअर सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग सस्पेंशन सिस्टिम देखील आहे.
चार्जिंग टाईम आणि रेंज -आपण ही कार स्लो आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह होम चार्ज करू शकतो. स्टँडर्ड चार्जिंगच्या माध्यमाने बॅटरी 6 ते 6.5 तासांत फूल चार्ज केली जाऊ शकते. तसेच फास्ट चार्जिंगने आपण 1.1 तासांपासून ते 1.7 तासांत हिची बॅटरी फूल चार्ज करू शकतात. हिची रेंज 140 किमी पर्यंत आहे.
असे आहेत फीचर्स -या कारमध्ये 7 इंचांचे टीएफटी इंफोटेनमेंट सिस्टिम, व्हॉइस असिस्ट आणि रिव्हर्स कॅमेऱ्याचा समावेश आहे. तसेच केबीन अधिकचे सामान ठेवण्यासाठी पुरेसे आहे. हिची किंमत अद्याप समोर आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, हिचे लॉन्चिंग याच वर्षाच्या अखेरीस होणे अपेक्षित आहे.