टाटा मोटर्सने फेस्टिव्हल सिझनची सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ह्युंदाईने टाटाला मागे टाकून पुन्हा दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. यामुळे आता टाटा मोटर्सने महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये ओणम सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यामुळे टाटाने सर्वच कार मॉडेलवर ६० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे.
टाटा मोटर्सने सांगितले की, हॅरिअर, सफारी सारख्या एसयुव्हींवर ओणम निमित्त ६० हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय टिगॉर, टियागो या कारवर २५००० रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. याशिवाय टिगॉरवर अतिरिक्त २० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
ऑगस्ट महिना हा कार कंपन्यांसाठी खास असतो. कारण या महिन्यापासून सणांना सुरुवात होते. महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु होतो. नारळीपौर्णिमा, जन्माष्टमी हे सणही ऑगस्टमध्येच येत आहेत. यामुळे या महिन्यात कार कंपन्या विक्री वाढविण्यासाठी डिस्काऊंट जारी करतात.
टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या हॅचबॅक कार Tiago NRG चे नवीन XT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने Tata Tiago NRG XT व्हेरिएंटची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोचे NRG व्हर्जन सादर केले होते. हे खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. आता एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने या कारचे नवीन व्हेरिएंट सादर केले आहे. टाटाने फेसलिफ्ट Tiago NRG ला ऑगस्ट 2021 मध्ये पुन्हा लाँच केले होते आणि ते फक्त पूर्णपणे लोडेड XZ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता एक नवीन परवडणारे व्हर्जन आहे, जे किंमत जवळपास 40,000 रुपयांपर्यंत खाली आणते.