गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागली आहे. मुंबईनजीकच्या वसईटमध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
सध्या पावसाचे दिवस आहेत. वसईतील एका रेस्ट़ॉरंटबाहेर टाटा नेक्सॉन ईव्ही उभी होती. यावेळी नेक्स़ॉनच्या खालच्या भागात जिथे बॅटरी ठेवलेल्या असतात तिथे आग लागली. लागलीच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. यावर प्रतिक्रिया देत कंपनीनं आपण या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं.
यावर ओला ईलेक्ट्रीकचे मालक भाविश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही कंपनीच्या ईव्हींना आग लागू शकते. जागतिक दर्जाच्या उत्पादनांनाही आगी लागल्या आहेत. परंतु आयसीई पेक्षा इहींना आगी लागण्याचे प्रमाण कमी आहे. असे म्हटले आहे. ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे अग्रवाल कमालीचे ट्रोल झाले होते. आता टाटाच्या ईव्ही कारला आग लागल्याने अग्रवाल यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.