Tata Motors नं नवी Tiago XTA ही कार ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह लाँच केली आहे. कंपनीनं नव्या Tiago XTA ला ऑटोमॅटिक लाईनअपमध्ये सामील केलं आहे. यानंतर टाटा टियागो एएमटी ऑप्शन्ससह येईल. एएमटी ऑप्शनसह येणारी टाटा मोटर्सची ही चौथी कार असणार आहे. कंपनीनं या कारची सुरूवातीची किंमत 5.99 लाख रूपये इतकी ठेवली आहे. या कारमध्ये आकर्षक फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये हर्मन या कंपनीचा 7 इंचाचा इन्फोटेन्मेंच टचस्क्रिन, 15 इंचाचे अलॉय व्हिल्स, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आदिंचा समावेश आहे. मार्केटमध्ये टाटा टियागोच्या या कारची स्पर्धा मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई आय 20 या कार्ससोबत असेल. Tata Tiago मध्ये 1199cc चं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 84.48 Hp ची पावर आमि 113 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. टियागोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे पर्याय मिळतात. ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह या कारचे चार व्हेरिअंट XTA, XZA, XZA Plus, आणि XZA Plus ड्युअल टोन रूफ येतात. टियागो ही कार टाटा मोटर्सनं 2016 मध्ये लाँच केली होती. तेव्हापासूनच ही कार आपल्या सेगमेंटमध्ये खुप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सनं 2020 मध्ये या कारचं BS6 व्हर्जन लाँच केलं होतं. या कारला जीएनसीएपीद्वारे 4 स्टार सेफ्टी रेटिंगही देण्यात आलं होतं. तसंच या सेगमेंटमधील ती सुरक्षित कारही ठरली होती.
TATA MOTORS नं लाँच केलं Tiago चं ऑटोमॅटिक व्हर्जन, पाहा किती आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 2:28 PM
Tata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहे. इतर कार्सच्या तुलनेत किंमत आहे फारच कमी
ठळक मुद्देTata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहेTata Motors नं नवी Tiago XTA ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतात लाँच केली आहे