नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) 'अनुभव-शोरूम ऑन व्हील्स लॉन्च केले आहे. हे ग्रामीण ग्राहकांना त्यांच्या दारात कार खरेदीचा अनुभव देईल. खेड्यापाड्यातील विपणन धोरणानुसार, हा उपक्रम तालुक्यांमध्ये कंपनीची पोहोच वाढविण्यात मदत करेल. ग्रामीण लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तालुक्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे.
संपूर्ण भारतातील गावांमध्ये टाटा मोटर्सच्या ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देशभरात 103 मोबाईल शोरूम्स तैनात केले जातील. हे मोबाईल शोरूम सध्याच्या डीलर्सना त्यांच्या ग्राहकांना घरोघरी खरेदीचा अनुभव देण्यास मदत करेल. या उपक्रमामुळे कार आणि एसयूव्ही, अॅक्सेसरीजच्या नवीन फॉरएव्हर रेंजची माहिती देण्यात मदत होईल. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच, ग्राहक टेस्ट ड्राइव्ह बुक करण्यास आणि एक्सचेंजसाठी उपलब्ध असलेल्या कारचे मूल्यांकन करू शकतील.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडमध्ये सेल्स, मार्केटिंग आणि कस्टमर केअरचे व्हाइस प्रेसिडेंट राजन अंबा म्हणाले की, आम्हाला अनुभव उपक्रम सुरू करताना आनंद होत आहे. हा ब्रँड गावागावात नेण्यासाठी हे एक उल्लेखनीय पाऊल आहे. आमची नवीन फॉरएव्हर रेंजची कार आणि एसयूव्हीला सर्वांपर्यंत बनवली आहे.यामुळे रिटेल आउटलेटच्या पारंपारिक मॉडेलवर ग्राहकांचे अवलंबून राहणे कमी होईल.
याचबरोबर, हे मोबाईल शोरूम ग्रामीण ग्राहकांसाठी वन स्टॉप सोल्युशन असेल, ज्यामुळे खेड्यात राहणाऱ्या ग्राहकांना कार, फायनान्स स्कीम आणि एक्सचेंज ऑफरची माहिती मिळेल. हे आम्हाला ग्राहकांच्या खरेदी पद्धतींबद्दल योग्य डेटा प्रदान करेल, ज्यामुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत आमची पोहोच आणखी वाढवता येईल. भारतातील एकूण प्रवासी वाहनांच्या विक्रीत ग्रामीण भारतातील विक्रीचा वाटा 40 टक्के आहे. या संकल्पनेसह, आम्हाला आमची पोहोच वाढवण्याचा आणि या बाजारपेठांमध्ये आमचा ग्राहकवर्ग वाढवण्याचा विश्वास आहे, असे राजन अंबा म्हणाले.
टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेईकल्सच्या फुली बिल्ट व्हेईकल्स (FBV) विभागाच्या कौशल्याने, अत्यंत विश्वासार्ह टाटा इंट्रा व्ही-10 वर चाकांवर एक्सपेरिअन्शिअल शोरूम विकसित करण्यात आले आहे. मोबाइल शोरूम टाटा मोटर्सच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली डीलरशिपद्वारे चालवले जातील. सर्व डीलरशिप या व्हॅनसाठी मासिक मार्ग ठरवतील जेणेकरून ते लक्ष्यित गाव किंवा तालुका कव्हर करू शकतील. या मोबाईल शोरूममध्ये जीपीएस ट्रॅकर बसवले जातील, जेणेकरून त्यांच्या हालचालींवर चांगल्या प्रकारे नजर ठेवता येईल.