TATA Motors Nexon EV Prime : टाटा मोटर्सनं आज नेक्सॉन ईव्ही प्राईम लाँच केली आहे. या कारमध्ये कंपनीनं मल्टी मोड रिजेन, क्रुझ कंट्रोल, इनडायरेक्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, स्मार्टवॉच इंटिग्रेटेड कनेक्टिव्हीटीसारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. नेक्सॉन ईव्ही प्राईम सिंगल चार्ज केल्यावर 312 किमीच्या एआरआय सर्टिफाईड रेंजसह येते. यामध्ये कंपनीनं हाय परफॉर्मन्स 30.2 kWh लिथिअम आयन बॅटरी दिली आहे.
कंपनी कारच्या बॅटरी आणि मोटरवर 8 वर्षे किंवा 1,60,000 किमी (जे पहिले असेल ते) ची वॉरंटी ऑफर करत आहे. याशिवाय या गाडीत 35 मोबाईल अॅप आधारित कनेक्टेड फीचर्स आहेतय आत रिमोट कमांड, व्हेईकल ट्रॅकिंगपासून ड्रायव्हिंग बिहेव्हिअर अॅनालिटिक्स, नेव्हिगेशन आणि रिमोट डायग्नोस्टिक्स सामील आहे.
किती आहे किंमत?व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि एअर प्युरिफायर सारख्या वैशिष्ट्यांसह Tata Motors Nexon EV Max ची किंमत 18.34 ते 19.84 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. तर दुसरीकडे अन्य फीचर्समध्ये ऑटो व्हेईकल होल्ड. डिस्क ब्रेक, वायरलेस चार्जर आदींचा समावेश आहे. तर नेक्सॉन प्राईम ईव्हीची किंमत 14.99 लाख रुपयांपासून 17.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
मोफत सॉफ्टवेअर अपडेटकंपनी आपल्या सर्व्हिस सेंटर्सवर २५ जुलैपासून कंपनीच्या विद्यमान ग्राहकांना पहिलं सॉफ्टवेअर अपडेट मोफत करून देतआहे. त्यानंतरचं सॉफ्टवेअर अपडेट मोफत दिलं जाणार नाही.