मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँडने प्रमुख एसयूव्ही हॅरियर व सफारीचे एक्सटीए+ व्हेरिअंट लाँच केले. हे नवीन व्हेरिअंट ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व पॅनोरॅमिक सनरूफसह येते. हॅरियर एक्सटीए+ साठी १९.१४ लाख रूपये, हॅरियर एक्सटीए+ #Dark साठी १९.३४ लाख रूपये व सफारी एक्सटीए+ साठी २०.०८ लाख रूपये किंमत ठेवण्यात आली आहे. (Tata Harrier, Safari get new XTA+ variants)
क्रायोटेक २.० डिझेन इंजिनची शक्ती असलेल्या नवीन एक्सटीए+ व्हेरिएण्ट्समध्ये इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत- जसे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ड्युअल फंक्शन एलईडी डीआरएलएस, आर१७ अलॉई व्हील्स, फ्लोटिंग आयलँड ७ इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह ८ स्पीकर्स (४ स्पीकर्स + ४ ट्विटर्स), अँड्रॉईड ऑटो व अॅपल कार प्ले कनेक्टीव्हीटी, पुश बटन स्टार्ट, फुल्ली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प्स आणि रेन सेन्सिंग वायपर्स देण्यात आले आहेत. तसेच सफारीमध्ये आयआरए कनेक्टेड कार वैशिष्ट्ये, मूड लायटिंग, क्रूझ कंट्रोल व टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत दोन्ही उत्पादनांमधील नवीन एक्सटीए+ व्हेरिएण्टमध्ये प्रमाणित वैशिष्ट्ये म्हणून ड्युअल फ्रन्ट एअरबॅग्स, प्रगत ईएसपी, फॉग लॅम्प्स व रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे. लँड रोव्हरच्या डी८ प्लॅटफॉर्मवर ओएमईजीएआरसी आर्किटेक्चरवर निर्माण करण्यात आलेल्या हॅरियर व सफारीमध्ये आकर्षक डिझाइन व कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे.
या नवीन व्हेरिअंटच्या सादरीकरणाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले, ''आम्हाला हॅरियर व सफारीसाठी मिळालेल्या प्रतिसादाचा खूप आनंद आहे. आमच्या ग्राहकांच्या गरजांना अधिक प्राधान्य देत आणि नवीन उत्पादने व वैशिष्ट्यांसह आमचा पोर्टफोलिओ सातत्याने सुधारत आहोत. दोन सर्वात मागणीदायी वैशिष्ट्यांनी सुसज्ज या एक्सटीए+ व्हेरिएण्ट्समध्ये सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देणारे ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि पॅनोरॅमिक सनरूफसह ग्लोबल क्लोज, अॅण्टी पिंच व रेन सेन्सिंग क्लोजर अशी वैशिष्ट्ये असतील.''