Tata Punch Micro SUV HBX: देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक TATA Motors नं सोमवारी आपली सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही TATA Punch देशांतर्गत बाजारात सादर केली. आतापर्यंत या कार एसयूव्हीला मीडिया रिपोर्टमध्ये 'एचबीएक्स' असे नाव दिले जात होते, परंतु आता कंपनीने ही कार पंच या नावानं सादर केली आहे. या एसयूव्हीचं कॉन्सेप्ट व्हर्जन कंपनीनं गेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान सादर केलं होतं आणि त्याची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती.
टाटा पंच ही कंपनीची अशी पहिली एसयूव्ही आहे जी ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर तयार करण्यात आली आहे. ही एसयुव्ही कॉम्पॅक्ट 2.0 डिझाईन लँग्वेजसह डेव्हलप करण्यात आली आहे. या एसयुव्हीला कंपनीनं कॉम्पॅक्ट स्पोर्टी लूक दिला आहे, तसंच हा लूक तरूण वर्गाला पसंत येईल असंही म्हटलं जात आहे.
Tata Punch मध्ये केवळ कमी किंमतीत तुम्हाला स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयुव्हीचा फील मिळणार नाहीत, तर यामध्ये टाटा हॅरिअरप्रमाणे टाईम रनिंग लाईट्स (DRL's) आणि बॉनेट देण्यात आलं आहे. याचे आकर्षक अलॉय व्हिल्स साईड प्रोफाईललाही जबरदस्त बनवतात. साईजमध्ये भलेही ही एसयुव्ही छोटी असेल परंतु मोठी व्हिल आर्क ही कार प्रत्येक प्रकारच्या रोड कंडिशनवर धावण्यास मदत करतात.
काय असू शकतात फीचर्स?कंपनीने अद्याप या एसयुव्हीच्या इंटिरियरविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परंतु जाणकारांच्या मते कंपनी या कारमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्क्वेअर शेप एसी व्हेंटसह तीन-स्पोक फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल टॅकोमीटर आणि अॅनालॉग स्पीडोमीटर दिले जाऊ शकतात.
असं मानलं जात आहे की कंपनी या कारमझ्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकतं, जे 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. कंपनी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील ही कार बाजारातही लाँच करू शकते.
किती असू शकते किंमत?लाँच होण्यापूर्वी या कारच्या किंमतीबद्दल काहीही सांगणं कठीण आहे, परंतु रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कंपनी या कारची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान ठेवू शकते. बाजारात ही मायक्रो एसयूव्ही प्रामुख्याने Maruti Ignis आणि Hyundai च्या आगामी छोट्या एसयुव्ही Casper शी स्पर्धा करेल.