टाटा मोटर्स लवकरच मारुती वॅगनआर आणि सेलेरियोचं टेन्शन वाढविण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपली आणखी एक सीएनजी कार भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीच्या Tiago NRG चे (Tiago NRG iCNG) हे CNG व्हेरिअंट असेल. ही कार कंपनीच्या Tata Tiago NRG वर बेस्ड असेल. कंपनीने आपल्या YouTube चॅनलवर अपकमिंग Tiago NRG iCNG चा एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. यात कंपनीने हिला "भारतातील पहिली टफरोडर सीएनजी" म्हटले आहे. या टीजर वरून, ही कार लवकरच लॉन्च केली जाऊ शकते, असा अंदाज लावला जाऊ शकतो.
अशी असेल किंमत -स्टँडर्ड टियागो हॅचबॅक आधीपासूनच सीएनजी पर्यायात उपलब्ध आहे. टियागो सीएनजीची किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरू होऊन 7.82 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जातात. तसेच, टियागो एनआरजीची किंमत सध्या 6.42 लाख रुपये ते 7.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान जाते. अशात, टियागो एनआरजी iCNG ची किंमत पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा साधारणपणे 90,000 रुपये अधिक होऊ शकते, असा अदाद लावला जाऊ शकतो.
पॉवरट्रेनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Tiago iCNG मध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे पेट्रोल मोडवर 86 PS ची पॉवर आणि 113 Nm टार्क जनरेट करते. तर CNG मोडवर 73.4 PS ची पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनी Tiago NRG iCNG मध्येही याच इंजिनचा वापर करू शकते. इंजिन सोबतच 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जाईल. कंपनीची टियागो सीएनजी 26KM हून अधिकचे मायलेज ऑफर करत आहे.
महत्वाचे म्हणजे, टाटा टियागोचे एनआरजी व्हर्जन स्टँडर्ड टियागोच्या तुलनेत अधिक स्टायलिश दिसून येते. याला बोल्ड बंपर, चारही बाजूंनी क्लॅडिंग, नवे व्हील्स, रूफ रेल्स, बॉडी कलर एक्सटीरियरचा वापर केल्याचे दिसून येते. याशिवाय या कारला स्टँडर्ड टियागोपेक्षा 11mm अधिक ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.