शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Tata Motors च्या या एसयुव्हीला तुफान डिमांड; काही महिन्यांतच 10000 चा आकडा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 4:00 PM

Tata Motors Safari SUV in Demand: टाटाने नवी सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे. 

Tata Motors ने पुण्यातील उत्पादन प्रकल्पात नुकत्याच लाँच झालेल्या Safari SUV च्या 10000 व्या युनिटचे उत्पादन केले आहे. याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली. टाटा मोटर्सने फेब्रुवारीमध्ये ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली होती. या महिन्यात 100 युनिट उत्पादन झाले होते. मात्र, त्यानंतरच्या चार महिन्यांत 9900 कारचे उत्पादन करण्यात आले आहे. (Tata says that the first 100th unit of the new Safari was rolled out in February 2021.)

नव्या टाटा सफारीला डायनामिक डिझाइन, आरामदायक थ्री-रो सीटिंग, प्रीमियम इंटीरियर, कीन ड्राइव्हिंग एक्सपीरिअंस आणि सुरक्षा सुविधांनी युक्त बनविल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

टाटा सफारीमध्ये थ्री-रो एसयूव्ही च्या मधल्या सीटमध्ये एक बेंच सीटसोबत सहा सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. तर दुसऱ्या रो मध्ये कॅप्टन सीटसोबत सात सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. हॅरिअरसारखेच डिझाईन देण्यात आले आहे. टाटाने नवी सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे. 

Kryotec इंजिन : टाटा मोटर्सचे डिझेल इंजिन खूप ताकदवान मानले जातात. या SUV मध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे Kryotec टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ने हे इंजिन लेस आहे. सफारीला XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + मध्ये आणण्यात आले आहे. ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl  मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. 

तसेच या कारमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी सनरुफ पहायला मिळणार आहे. टाटा सफारी पहिल्यांदा 1998 मध्ये लाँच झाली होती.  

टॅग्स :Tataटाटा