नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आता सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कार मेंटेन करणे कठीण होत आहे. यातच आता इलेक्ट्रिक कारमुळे भारतीय बाजारपेठेत स्पर्धा सुरू झाली आहे. ग्राहक सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना पसंत करू लागले आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक कारच्या किंमती थोड्या जास्त आहेत. मात्र, एक अशी कार आहे, जी किफायतशीर देखील म्हणता येईल आणि एका चार्जमध्ये लांब अंतर देखील कापू शकेल. ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. होय, आम्ही टाटा मोटर्सच्या (Tata Motors) टिगोर ईव्हीबाबत (Tigor EV) सांगत आहोत. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 300 किमी धावते. म्हणजेच 50 पैशांमध्ये 1 किमी धावते.
टिगोर ईव्ही कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी 12.99 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये 306 किमीची विस्तारित ARAI प्रमाणित रेंज असल्याचा दावा केला जातो. टिगोर ईव्हीवर 73 Bhp आणि 170 Nm पीक टॉर्क मिळते आणि पॉवर 26-kWh लिक्विड-कूल्ड, हाय एनर्जी डेंसिटी बॅटरी पॅकमधून येते. कारमध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक आहे. कारला 8 वर्षे आणि 160,000 किमी बॅटरी आणि मोटर वॉरंटी दिली जात आहे.
ड्युअल टोन पर्याय उपलब्धकंपनी XE, XM आणि XZ+ या तीन व्हेरिएंटमध्ये नवीन टिगोर ईव्ही ऑफर करत आहे. XZ+ वर ड्युअल टोन पर्याय देखील उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कार ड्रायव्हिंगची गतीशीलता आणि वेगवान हाताळणीसाठी संतुलित सस्पेंशनसह येते. इतर फीचर्समध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्ड करण्यायोग्य ORVM आणि पुश बटण स्टार्टसह स्मार्ट की यांचा समावेश आहे. तसेच, कार रिमोट कमांड्स आणि रिमोट डायग्नोस्टिक्ससह 30+ कनेक्टड कार फीचर्ससोबत येते.
फास्ट चार्जसोबत स्लो चार्जकंपनीचे म्हणणे आहे की, कार जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त CCS2 चार्जिंग सिस्टमसह येते आणि कोणत्याही 15A प्लग पॉईंटवरून जलद-चार्ज तसेच स्लो चार्ज होऊ शकते. ग्लोबल एनकॅपने टिगोर ईव्हीसाठी क्रॅश टेस्टचे निकाल जारी केले आहेत, ज्यामध्ये कारला 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी याला 4 स्टार मिळाले आहेत. क्रॅश टेस्ट संस्थेच्या ‘सेफर कार्स फॉर इंडिया’ उपक्रमांतर्गत करण्यात आली.