शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दमदार रेंजच्या TATA Nexon ला मिळणार जबरदस्त हायटेक फीचर्स; फुल चार्ज करा अन् विसरून जा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 6:07 PM

या ईव्हीला देशातील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि या नवीन मॉडेलमुळे या विक्रीत आणखी वाढ होईल.

नवी दिल्ली - टाटा मोटर्स लवकरच आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Nexon EV अपग्रेड करून बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कारचे टेस्ट मॉडेल नुकतेच बघायला मिळाले आहे. यात एसयूव्हीसह नवे अलॉय व्हील आणि मागच्या चाकांना डिस्क ब्रेक दिसून आले आहे. तत्पूर्वी, दिल्ली आरटीओच्या कागदपत्रांवरून समजून येते, की या नव्या ईव्हीला 136PS इलेक्ट्रिक मोटर मिळू शकते, ही मोटर पूर्वीच्या तुलनेत 7PS अधिक शक्तिशाली आहे. या ईव्हीला देशातील ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि या नवीन मॉडेलमुळे या विक्रीत आणखी वाढ होईल.

Nexon EV ला आता 40 किलोवॅट-आर बॅटरी पॅक!आता नेक्सॉन ईव्हीला 40 किलोवॅट-आर बॅटरी पॅक मिळ शकतो. जो सध्याच्या पॅकच्या तुलनेत 10 किलोवॅट-आर अधिक असेल, असे अनेक वृत्तांतून समोर आले आहे. ही कार नुकतीच पुण्यात टेस्टिंग करताना दिसून आली आहे. तसेच हे टेस्ट मॉडेल डुअल-बीम एलईडी हेडलॅम्प्स आणि यासोबत असलेल्या एलईडी डीआरएलसह दिसून आले आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक SUV ला नवा लुक देण्यासाठी कंपनीने हिला 16-इंचाचे डुअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हिल्स लावले आहेत. 

नेक्सॉन ईव्हीसोबत ऑटो हेडलॅम्प्स -अपडेटेड मॉडेलच्या इंटीरिअरमध्ये साधारणपणे सर्व फीचर्स आणि लेआऊट सध्याच्या मॉडेल प्रमाणेच असू शकतात. मात्र, कंपनी संपर्धेच्या दृष्टीने यात काही फीचर्स वाढवूही शकते. नेक्सॉन ईव्हीसह ऑटो हेडलॅम्प्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि असे काही इतरही फीचर्स मिळण्याचा अंदाज आहे. सुरक्षितेसंदर्भात, बोलायचे झाल्यास, नवीन मॉडेलमध्ये ABS सह EBD, ISOFIX, समोरच्या भागात दोन एअरबॅग्स, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स मिळणार आहेत. ताज्या माहितीनुसार, लांब पल्ल्याची Tata Nexon समोरील बाजूस व्हेंटिलेटेड सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि पार्क मोडसह येईल.

कारची रेंज 312 असण्याचा दावा -सध्याच्या Tata Nexon EV सह, कंपनीने 30.2 kWh-R लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. तो पर्मनंट सिंक्रोनस मॅगनेटसह येतो. या कारची रेंज 312 असल्याचा दावा एआरएआयने केला आहे. मात्र, ही एका फुल चार्जमध्ये रस्त्यावर 300 किमीपर्यंत धावू शकते. हा पावरट्रेन 125 बीएचपी एवढी ताकद आणि 245 एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. एवढेच नाही, तर या इलेक्ट्रिक मोटरसह ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आले आहे. आगामी Nexon EV ची तांत्रिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत आम्ही यासंदर्भात आणखी माहिती आपल्यासाठी घऊन येऊ.

टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारcarकार